शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

LJP नेत्याचे अपहरण, अपहरणकर्त्यांनी फोन करून केली 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 21:39 IST

Kidnapping : एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.

ठळक मुद्देलोक जनशक्ती पार्टी आदिवासी सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष अनिल उरांव यांचे अपहरण करून अपहरणकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबियांकडून दहा लाख रुपयांची खंडणी मागितली आहे.

बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील केट पोलिस स्टेशन अंतर्गत जेपी नगर येथील लोक जनशक्ती पार्टी आदिवासी सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष अनिल उरांव यांचे अपहरण करून अपहरणकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबियांकडून दहा लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.या घटनेची माहिती देताना पोलिस अधीक्षक दयाशंकर यांनी शुक्रवारी सांगितले की, अनिल उरांव यांच्या सुरक्षित सुटकेसाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले की, पोलिस पथक वैज्ञानिक संशोधनातून अपहरणकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सतत छापा टाकत आहेत.

बिहारमधील कायदा व सुव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. गुन्हेगारीच्या घटनांमुळे नितीशकुमार सरकार अडचणीत येत आहे. राज्यात बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेमुळे विरोधी पक्ष नितीशकुमार यांच्या सरकारवर टीका करत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री नितीशकुमार कायदा व सुव्यवस्थेबाबत सातत्याने आढावा बैठक घेत आहेत. मुख्यमंत्री आदेश देऊन सतत  कायदा व सुव्यवस्था सुरळीत असल्याच्या बाता मारत आहेत.

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिसLok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीBiharबिहार