शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलगा अंगावर थुंकला, ​त्याच्या आईला चौघांनी केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 19:30 IST

Crime News : तुमचा मुलगा राज ह्याने आपल्या अंगावर थुंकल्याची तक्रार विवेक याने गुडियादेवी यांच्याकडे केली. त्यावर राज याला बोलावून पकडून मारते असे तिने विवेकला सांगितले.

मीरारोड - लहान मुलगा अंगावर थुंकला म्हणून त्याच्या आईला चार महिलांनी मिळून बेदम मारहाण केल्या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.

गुप्ता गल्लीत गुडीयादेवी सैनी (२३) ह्या पती मुकेश व दोन मुलांसह राहतात. मंगळवारी सायंकाळी त्याच गल्लीत राहणाऱ्या छाया गुप्ता हिचा नातू विवेक हा सैनी यांच्या घरी गेला. तुमचा मुलगा राज ह्याने आपल्या अंगावर थुंकल्याची तक्रार विवेक याने गुडियादेवी यांच्याकडे केली. त्यावर राज याला बोलावून पकडून मारते असे तिने विवेकला सांगितले.

काहीवेळातच छाया सह बन्ना, मीना व मोटीबाई ह्या चौघी जणी गुडियादेवीच्या घरा बाहेर आल्या आणि त्यांना शिव्या देऊन लागल्या. शिवीगाळ का करता ? अशी विचारणा केली असता विवेकची आई बन्ना हिने, तुझा मुलगा राज हा माझ्या मुलाच्या अंगावर थुंकला असे सांगून पुन्हा त्या चौघीनी शिवीगाळ करायला सुरवात केली. गुडियादेवी समजूत काढू लागली असता त्या चौघीनी तिला खेचून ठोशाबुक्क्यांनी व लाथांनी मारहाण सुरु केली. बन्ना हिने गुडियादेवीचा कान धरून खेचला असता कानातील रिंग ओढली गेल्याने कानाची पाळी फाटून रक्त वाहू लागले.

गुडियादेवी हिने स्वतःची सुटका करून घेत भाईंदर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी उपचारासाठी चिठ्ठी दिल्यावर आधी भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयात गेल्या. तेथून त्यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले . उपचारानंतर ५ जानेवारी बुधवार रोजी पोलिसांनी छाया, बन्ना, मीना व मोटीबाई ह्या चौघींवर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसmira roadमीरा रोड