शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला लाऊड म्युजिक ऐकून शेजारी भडकला, रागाच्या भरात केला गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 21:34 IST

Firing Case :पीडितेच्या नातेवाईकांनी सांगितले की, मोनकाडा घराच्या लॉनमध्ये घुसला आणि भांडण करू लागला. त्याला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तोपर्यंत त्याने गोळीबार केला. एक गोळी पीडितेच्या पाठीला लागली.

शेजाऱ्याने मोठ्या आवाजात लावलेले म्युजिक सहन न झाल्यामुळे तरुणाने रागाच्या भरात त्याच्यावर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. लाऊड म्यूजिकमुळे झालेल्या वादानंतर एका व्यक्तीने शेजाऱ्यावर गोळ्या झाडल्या. शेजारी मोठ्या आवाजात संगीत वाजवत होता, यावरून त्या व्यक्तीचा त्याच्याशी वाद झाला. दोघांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर एकाने दुसऱ्यावर गोळी झाडली.

'न्यूयॉर्क पोस्ट'च्या रिपोर्टनुसार, ही घटना अमेरिकेतील फ्लोरिडा येथील आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला मोठ्या आवाजामुळे झालेल्या वादात एका व्यक्तीने शेजाऱ्यावर गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने व्यक्तीस रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिपोर्टनुसार, 31 वर्षीय जॅचरी मोनकाडा यांच्यावर शेजाऱ्यावर गोळी झाडल्याचा आरोप आहे. पीडितेच्या नातेवाईकांनी सांगितले की, मोनकाडा घराच्या लॉनमध्ये घुसला आणि भांडण करू लागला. त्याला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तोपर्यंत त्याने गोळीबार केला. एक गोळी पीडितेच्या पाठीला लागली.  तरुणाने रागाच्या भरात त्याच्या बंदुकीतून गोळीबार केला. त्यातील एक गोळी शेजाऱ्याच्या पाठीला लागली. त्यानंतर इतरांनी तरुणाला पकडून त्याच्याकडील बंदूक काढून घेतली आणि त्याला निशःस्त्र केलं. मात्र तोपर्यंत शेजारी जखमी झाला होता आणि त्याच्या वेदना वाढल्या होत्या. 

गोळीबार झाल्यानंतर शेजाऱ्याला त्याच्या कुटुंबींयांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि उपचार सुरू केले. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे. तर गोळीबार करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिसAmericaअमेरिका