शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सॲप मेसेजमधील लिंक उघडली अन् क्षणार्धात २१ लाख रुपये गायब!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 08:19 IST

मोबाइलवर एक व्हॉट्सॲप संदेश व त्याबरोबर एक लिंक आली. ती लिंक उघडताच एका निवृत्त शिक्षिकेच्या बँक खात्यातून २१ लाख रुपये लंपास करण्यात आले.

अण्णामय्या :

मोबाइलवर एक व्हॉट्सॲप संदेश व त्याबरोबर एक लिंक आली. ती लिंक उघडताच एका निवृत्त शिक्षिकेच्या बँक खात्यातून २१ लाख रुपये लंपास करण्यात आले. आंध्र प्रदेशातील अण्णामय्या जिल्ह्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

वरलक्ष्मी असे या निवृत्त शिक्षिकेचे नाव असून, त्यांना मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून एक व्हॉट्सॲप संदेश आला. त्यात एक लिंक दिलेली होती. वरलक्ष्मी यांनी ती लिंक उघडताच त्यांचा फोन हॅक झाला. त्यांच्या बँक खात्यातून २१ लाख रुपये काढून घेण्यात आले. इतकी मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वरलक्ष्मी यांनी पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी सायबर पोलीस तपास करत आहेत. 

अज्ञात व्यक्तींनी वरलक्ष्मी यांच्या बँक खात्यातून आधी २० हजार, मग ४० हजार रुपये व त्यानंतर ८० हजार रुपये काढले. मग टप्प्याटप्प्याने एकूण २१ लाख रुपयांवर डल्ला मारला. 

यासंदर्भात पोलीस अधिकारी मुरलीकृष्णा यांनी सांगितले की, अण्णामय्या जिल्ह्यातील मदनपल्ली येथील रहिवासी असलेल्या निवृत्त शिक्षिका वरलक्ष्मी यांनी व्हॉट्सॲपवर आलेल्या संदेशाबरोबर असलेली लिंक अनेकदा उघडली. त्यामुळे प्रत्येक वेळा त्यांच्या बँक खात्यातून पैसे लंपास करण्यात आले. त्यांचा फोन हॅक करण्यात आला होता. या प्रकारानंतर काही वेळाने खात्यातून २१ लाख रुपये वळते झाल्याचे त्यांना एसएमएस आले. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार केली.

सॉफ्टवेअर कर्मचाऱ्यालाही घातला गंडामदनपल्ली येथील ज्ञानप्रकाश व्यक्तीलाही काही दिवसांपूर्वी व्हॉट्सॲपवर एका अनोळखी क्रमांकावरून संदेश आला होता. त्यात दिलेली लिंक उघडल्याने ज्ञानप्रकाश यांच्या बँक खात्यातील १२ लाख रुपये अज्ञात व्यक्तींनी लंपास केले होते. ज्ञानप्रकाश हे सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या झालेल्या फसवणूक प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप