शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

तीन इराकी पर्यटकांना लावला चुना; लंडनधील व्यक्ती हाेती लुटारुंच्या संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 15:37 IST

Crime News : तीन आराेपी गजाआड, दाेन फरार    

ठळक मुद्देपरदेशी नागरिकांना लुटल्यानंतर त्यांना खालापूर टाेल नाक्याजवळ साेडण्यात आले हाेते. त्यानंतर ते पुन्हा मुंबई येथे गेले आणि सहारा पाेलिस ठाण्यात घडलेला सर्व प्रकार सांगितला.

आविष्कार देसाई   

                                                                                                                            रायगड - भारतात फिरण्यासाठी आलेल्या तीन परदेशी नागरिकांना लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. तीनही पर्यटक हे इराक देशातील असल्याची माहिती मिळत आहे. परदेशातील त्यांच्या नातेवाईकांना धमकी देत खंडणी देखील मागतली हाेती. याप्रकरणी पाेलिसांनी तीन आराेपींना पकडले आहे. अन्य फरार आराेपींचा शाेध सुरु आहे. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे. 

परदेशी नागरिकांना लुटल्यानंतर त्यांना खालापूर टाेल नाक्याजवळ साेडण्यात आले हाेते. त्यानंतर ते पुन्हा मुंबई येथे गेले आणि सहारा पाेलिस ठाण्यात घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर ते काेठे गेले याबाबत माहिती मिळत नसल्याचे पाेलिस सुत्रांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातील खालापूर पाेलिस ठाण्यातही या घटनेची नाेंद करण्यात आली आहे. भारतातील पाच आराेपींच्या संपर्कामध्ये लंडनमधून एक व्यक्ती संपर्कात हाेती. लंडनमधील ती व्यक्ती एजंट असल्याचे बाेलले जाते. त्यांनेच इराकी नागरिकांची माहिती भारतातील लुटारुंना दिल्याचे समाेर येत आहे.

26 डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे परदेशी नागरिक उतरले. यावेळी विमानतळावर काही व्यक्ती त्यांच्या नावाचे बोर्ड घेवून उभे होते. बोर्ड पाहून परदेशी नागरिक त्यांच्या वाहनातून इच्छित स्थळी जाण्यास निघाले. त्यावेळी आपले अपहरण झाले आहे. याची त्यांना माहिती नव्हती. लुटारुंपैकी एकाने आपण सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत या परदेशी नागिरकाचे पासपोर्ट आणि मोबाईल काढून घेतले. अन्य चार जणांनी परदेशात त्याच्या नातेवाईकांकडे फोनद्वारे संपर्क साधत खंडणीची मागणी केली. खंडीची मागणी पूर्ण होईपर्यंत त्यांना गाडीमधून ठिकठिकाणी फिरवले. पैसे मिळत नाही याचा अंदाज आल्यानंतर सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास या लुटारुंनी या परदेशी नागरिकांना मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील खालापूर टोलनाक्यापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर साेडले. त्या आधी त्यांनी त्यांना अटक करण्याची धमकी देत पैसे, मोबाईल आणि बॅग असा सुमारे 90 हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला.खालापूर टोलनाका येथे पोलिस असल्याचे पाहील्याने लुटारुंचे धाबे दणाणले. त्यांनी पैस घेऊन मोबाईल आणि बॅग वाहनातच ठेवले आणि तेथून पळ काढला. पाेलिसांनी उरण-केगाव, पुणे आणि सातारा-मान येथून तीन आराेपींना अटक केली आहे.

                                                                                                                                                                                                        भारतातील पाच आराेपींसाेबत लंडनमधून एक व्यक्ती संपर्कात हाेती. त्या व्यक्तीकडून सर्व माहिती मिळत असल्याने तीन इराकी पर्यटकांना ट्रप करणे साेपे गेले. पाेलिसांनी तीन आराेपींना पकडले आहे. अन्य लवकरच पाेलिसांच्या जाळ्यात सापडतील.  -  अशाेक दुधे (जिल्हा पोलीस अधिक्षक) 

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसRaigadरायगडArrestअटकLondonलंडन