मुंबई - पश्मिच रेल्वे मार्गावरील महालक्ष्मी रेल्वे स्थानकावर चालत्या लोकलखाली येणाऱ्या प्रवाशाचे प्राण पोलिसांनी वाचविले. गुरूवारी सकाळी १० च्या सुमारास संबंधित प्रवाशाला चर्चगेटला जायचे होते. मात्र गैरसमजुतीने गोरेगावला जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये चढला. लोकल सुरू झाल्यावर चुकीच्या लोकलमध्ये चढल्याचे लक्षात आले. यावेळी लोकल सुरू झाली होती. संबंधित प्रवाशाने चालत्या लोकलमधून उतरण्याचा प्रयत्न करत असताना, तोल जाऊन लोकलच्या खाली जाणार होता. इतक्यात स्थानकावर असलेल्या पोलिसांनी प्रवाशाला तत्काळ पकडून बाजूला केले. आपले प्राण वाचले आहेत, यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी त्याला भानावर आणून पाणी पाजले. त्यांची विचारपूस करून त्याला इच्छितस्थळी पोहचविण्यास सहकार्य केल्याची माहिती मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र धिवार यांनी सांगितले.
शाब्बास पोलिसांनो! लोकलखाली येणाऱ्या प्रवाशाचे वाचविले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 21:52 IST
संबंधित प्रवाशाने चालत्या लोकलमधून उतरण्याचा प्रयत्न करत असताना, तोल जाऊन लोकलच्या खाली जाणार होता.
शाब्बास पोलिसांनो! लोकलखाली येणाऱ्या प्रवाशाचे वाचविले प्राण
ठळक मुद्देमहालक्ष्मी रेल्वे स्थानकावर चालत्या लोकलखाली येणाऱ्या प्रवाशाचे प्राण पोलिसांनी वाचविले. इतक्यात स्थानकावर असलेल्या पोलिसांनी प्रवाशाला तत्काळ पकडून बाजूला केले.