शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मावस सासऱ्याचा खून करणाऱ्यास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 17:51 IST

बुलडाणा : सोयरीक जुळवून देणाऱ्या मावस सासऱ्याची गळा चिरुन हत्या केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस सात आॅगस्ट रोजी जन्मठेप व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देबाबुराव खोंडे यांनी कुलंबखेड येथील गणेश कानडजे वय २६ याची मध्यस्थी करुन सोयरीक जुळविली होती. पत्नी दिपाली गतीमंद असल्याचा आरोप करीत गणेश फारकतीसाठी नेहमी तगादा लावत होता. फारकतीच्या मुद्दयावरुन वाद झाल्याने गणेश याने बाबुराव खोंडे यांची गळ्यावर वार करुन हत्या केली.

बुलडाणा : सोयरीक जुळवून देणाऱ्या मावस सासऱ्याची गळा चिरुन हत्या केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस सात आॅगस्ट रोजी जन्मठेप व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तालुक्यातील अटकळ येथील बाबुराव खोंडे यांनी कुलंबखेड येथील गणेश कानडजे वय २६ याची मध्यस्थी करुन सोयरीक जुळविली होती. मात्र पत्नी दिपाली गतीमंद असल्याचा आरोप करीत गणेश फारकतीसाठी नेहमी तगादा लावत होता. परंतू मावस सासरे बाबुराव खोंडे आपल्याला मदत करीत नाहीत त्याचा गैरसमज होता. दरम्यान ४ नोव्हेंबर २०१६ रोजी बाबुराव खोंडे सागवन येथील गायरान परिसरातील नातेवाईकांकडे आले होते. गणेश कानडजेही तेथे उपस्थित होता. दोघांमध्ये फारकतीच्या मुद्दयावरुन वाद झाल्याने गणेश याने बाबुराव खोंडे यांची गळ्यावर वार करुन हत्या केली. मृतकाचा मुलगा विशाल खोंडे याने याबाबत शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली. त्यावरुन कलम ३०२ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांनी तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे ९ साक्ष नोंदविण्यात आल्या. फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष सर्वात महत्वाची ठरली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायधीशांनी आरोपी गणेश कानडजे यास ७ आॅगस्ट रोजी जन्मठेप व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. अमोल बल्लाळ यांनी बाजू मांडली. सरकार पक्षास अ‍ॅड. राजेश खुर्दे यांनी सहकार्य केले. हे प्रकरण चालविण्यासाठी पोलिस हेड कॉन्स्टेबल किशोर कांबळे, गजानन मांटे, न्यायालयीन कर्मचारी विजय काळे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrimeगुन्हाCourtन्यायालय