शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
6
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
7
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
8
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
10
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
11
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
12
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
13
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
14
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
15
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
16
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
17
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
18
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
19
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
20
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही

एकाची हत्या करणाऱ्या दोघांना जन्मठेप, कल्याण न्यायालयाचा निकाल

By सचिन सागरे | Published: April 30, 2024 3:32 PM

२०१८ मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी संदेश घडशी (४०) आणि त्यांच्या शेजारी राहणारा आरोपी विनय यांच्यात चाळीच्या गेटजवळ लावण्यात आलेल्या रिक्षावरून वाद झाला.

कल्याण : रिक्षा लावण्याच्या वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एकाची गळा दाबून हत्या करणाऱ्या नरेंद्र नारायण आडविलकर (३८) आणि विनय मोतीराम ताम्हणकर (५०) या दोघांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. आर. जी. वाघमारे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

२०१८ मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी संदेश घडशी (४०) आणि त्यांच्या शेजारी राहणारा आरोपी विनय यांच्यात चाळीच्या गेटजवळ लावण्यात आलेल्या रिक्षावरून वाद झाला. हाच राग मनात धरून त्याचदिवशी संध्याकाळी विनयसह त्याचा मेव्हणा नरेंद्र यांनी रिक्षाचालक संदेश यांना मारहाण केली. त्यानंतर, संदेशची गळा दाबून हत्या करण्यात आली.  याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी आरोपी नरेंद्र आणि विनय या दोघांविरोधात आरोपपत्र सादर केले. या खटल्यात सरकारी वकील संजय गोसावी यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी पोलीस उपनिरीक्षक बी. एन. पवार आणि पोलीस हवालदार ए. पी. तायडे यांनी मदत केली.

टॅग्स :kalyanकल्याणCourtन्यायालय