शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

बिबट्या ठरला अंधश्रद्धेचा बळी, आरोपींची संख्या पोहोचली अकरावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 21:20 IST

बिबट्याची शिकार अघोरी शक्ती प्राप्त करण्यासाठी करण्यात आल्याचे वनविभागाच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.

वर्धा - मांडवा शिवारात गुरूवारी दोन ते अडीच वर्षीय बिबट्याचा मृतदेह पाय व मुंडके नसलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. या बिबट्याची शिकार अघोरी शक्ती प्राप्त करण्यासाठी करण्यात आल्याचे वनविभागाच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. अटक केलेल्या आरोपींकडून मृत बिबट्याचे तीन पाय आणि मुंडके जप्त करण्यात आले आहे. परंतु, बिबट्याचा चौथा पाय अद्यापही वनविभागाच्या अधिका-यांना मिळालेला नाही. शुक्रवारी सात आरोपींना अटक करून त्यांची १५ डिसेंबरपर्यंत वनकोठडी वनविभागाच्या अधिकाºयांनी मिळविली आहे. तर शनिवारी आणखी चार आरोपींना वनविभागाच्या अधिका-यांनी अटक केल्याने सध्या आरोपींची संख्या अकरावर पोहोचली आहे.वनविभागाच्या अधिका-यांनी शनिवारी अटकेत असलेल्या आरोपींना सोबत घेऊन घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. इतकेच नव्हे तर आरोपींनी गुन्हा कशा पद्धतीने केला याची माहितीही जाणून घेतली. शुक्रवारी वनविभागाच्या अधिका-यांनी गोविंद केकापूरे, प्रवीण बुरघाटे, मंगल मानकर, महेश आमझरे, राहूल कासार, रमेश कासार, नरेंद्र कासार या आरोपींना अटक करून त्यांची १५ डिसेंबरपर्यंत वनकोठडी मिळविली आहे. तर शनिवारी अशोक चाफले, आनंदा चाफले, आनंदा रावेकर तर राजू कुभेंबार यांना अटक करण्यात आली आहे. गुरूवारी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एका आरोपीने अघोरी शक्तीच्या प्राप्तीसाठी संगणमत करून बिबट्याची शिकार केली, शिवाय पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने बिबट्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचाही प्रयत्न केल्याचे वनविभागाच्या अधिकाºयांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.शनिवारी अटकेतील आरोपींना सोबत घेत वनविभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रसंगी सहाय्यक उपवनसंरक्षक तुषार डमढेरे, वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड, क्षेत्र सहाय्यक उमेश शिरपुरकर, श्याम परडके, रवी राऊत, जाकीर शेख, विनोद सोनवणे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीleopardबिबट्या