शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

चिनी ॲपद्वारे सावकारी, ईडीने लावला चाप; कर्ज देणाऱ्या कंपन्यांची संपत्ती जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 11:54 IST

मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग करत या कंपन्यांनी अनेक ग्राहकांना कर्ज वितरण केले. मात्र, भरमसाठ प्रक्रिया शुल्क आणि अवाजवी व्याजदर यामुळे ग्राहकांना याचा मोठा फटका बसला.

मुंबई : कोविड काळात मोबाईल ॲपद्वारे सुलभ कर्जाचे आमिष दाखवत ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या काही वित्तीय कंपन्यांना ईडीने (सक्तवसुली संचालनालय) चाप लावत सुमारे सहा कोटी १७ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. या कंपन्यांनी कर्ज वितरण करताना घसघशीत प्रक्रिया शुल्क आणि बेसुमार व्याजदर आकारले होते. यामुळे मोबाईल ॲपद्वारे एकप्रकारे होणाऱ्या खाजगी सावकारीला ईडीने चाप लावला आहे. 

धक्कादायक गोष्ट म्हणजे, या कंपन्यांची सूत्र चीनवरून हालत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. उपलब्ध मााहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत कॅश मास्टर, क्रेझी रुपे, कॅशिन, रुपी मेन्यू ही ॲप्स बाजारात आली. या ॲप्सद्वारे ग्राहकांना सुलभरीत्या कर्ज वितरणाचे आमिष दाखवत भुलविण्यात आले. मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग करत या कंपन्यांनी अनेक ग्राहकांना कर्ज वितरण केले. मात्र, भरमसाठ प्रक्रिया शुल्क आणि अवाजवी व्याजदर यामुळे ग्राहकांना याचा मोठा फटका बसला. या प्रकरणाच्या निमित्ताने या कंपन्यांचे चीनी कनेक्शन ही उजेडात आले आहे. या कंपन्या वरकरणी भारतीय नागरिकांच्या मालकीच्या असल्या तरी याचे खरे मालक हे चीनी नागरिक असल्याचेही ईडीच्या तपासात दिसून आले आहे. 

कर्जापोटी वितरित करण्यात आलेल्या पैशांचा स्त्रोत हा चीनी कंपन्यांचा होता तसेच व्याजापोटी मिळणारे पैसे देखील चीनकडे वळविण्यात आल्याचे तपासात दिसून आले. या कारणास्तव ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत (पीएमएलए) या कंपन्यांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. 

कसा झाला गैरव्यवहार ?हा खेळ सुरू करण्यासाठी चीनी नागरिकांनी भारतातील काही चार्टर्ड अकाऊंटंटशी संगनमत केले. या चार्टर्ड अकाऊंटंटनी भारतातील काही गरीब तरुणांना पैशाचे आमिष देत त्यांची ओळखपत्र, पॅन कार्डाची प्रत घेतली. याच कागदपत्रांच्या आधारे नो युअर कस्टमर (केवायसी) प्रक्रिया पार पाडत कंपन्यांची स्थापना करण्यात आली तसेच या कंपन्यांमध्ये या गरीब लोकांना संचालक, समभाग धारक बनविण्यात आले.या कंपन्यांना कर्ज वितरणासाठी जो निधी उपलब्ध झाला तो, प्रामुख्याने परदेशातून त्यातही चीनमधून आला होता. हे पैसे नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांच्या मार्फत ॲपच्या माध्यमातून कर्जापोटी देण्यात आले.