शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

दोन बायकांना सोडून लागला तिसरीच्या मागे; एकीशी हिंदू तर दुसरीशी मुस्लिम बनून केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 20:38 IST

Fraud Case : आरोपी तरुणाच्या दोन्ही पत्नींनी एकत्रितपणे प्रताप नगर पोलिस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. आरोपी पती फरार आहे.

जोधपूर - दोन पत्नींना मारहाण केल्यानंतर आता एक तरुण तिसरे लग्न करण्याच्या तयारीत आहे. हे विचित्र प्रकरण आहे जोधपूरचे. आरोपी तरुणाच्या दोन्ही पत्नींनी एकत्रितपणे प्रताप नगर पोलिस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. आरोपी पती फरार आहे.

फसवणूक करून एकीने राजूशी तर दुसरीने इम्रानशी लग्न केलेआरोपी तरुणाने एकीशी राजू असल्याचे भासवून लग्न केले तर दुसरीही इम्रान असल्याचं सांगून निकाह केल्याचा आरोप दोन्ही पत्नींनी केला आहे. तसेच आता तो तिसऱ्या लग्नाच्या तयारीला लागला आहे. दोघींचे म्हणणे आहे की, आधी आम्हाला फसवून लग्न केले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. पतीने दोन्ही महिलांना सोडले आहे. आता तिसऱ्या महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त होणार असल्याने तिने पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.

२०११ मध्ये पहिले लग्न,२०२१ मध्ये दुसरे लग्न, आता दोघींनाही सोडून गेला

आरोपीने २०११ मध्ये हिंदू असल्याचे भासवून लग्न केल्याचे दोन्ही महिलांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर २९ जुलै २०२१ रोजी मुस्लिम बनून मुस्लिम मुलीशी लग्न केले. आता या व्यक्तीने त्या दोघांनाही सोडले आहे. दोन्ही मुलींना घरोघरी भटकावे लागत आहे. आरोपी दुकान चालवतो असे दोघांनी सांगितले. पण तो तिथेही सापडला नाही.

हिंदू मुलीने सांगितले की, तिने मंदिरात सात फेरे मारले, नंतर मारहाण करून घराबाहेर काढले 

हिंदू मुलगी नीतू हिने सांगितले की, आरोपीने २०११ मध्ये तिच्यासोबत मंदिरात सात फेरे मारून लग्न केले. लग्नाच्या काही काळानंतर त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. नंतर घरातून हाकलून दिले. तीही परत गेली नाही. बऱ्याच दिवसांनी तिला समजले की, इम्रान दुसऱ्या मुलीशी लग्न करत आहे. यादरम्यान इम्रानने मुस्लिम तरुणी आयशाशी लग्न केले. तिच्यासोबत राहू लागला. मात्र काही दिवसांनी तो तिलाही मारहाण करू लागला. नंतर घरातून हाकलून दिले. यादरम्यान आयशाला नीतूबद्दल माहिती मिळाली.आयशाने १० नोव्हेंबर रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. इम्रानची चौकशी करण्यासाठी पोलीस पोहोचले तेव्हा तो या शहरात नसल्याचे कळले. पोलिसांनी याप्रकरणी पुढील कारवाई न केल्याने रविवारी दोन्ही महिला पुढे आल्या. पोलिसांकडे  दोन्ही मुलींनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करत आहेत. तर पोलीस इम्रानचा शोध घेत आहेत.

 

टॅग्स :marriageलग्नfraudधोकेबाजीPoliceपोलिसHinduहिंदूMuslimमुस्लीम