शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सुनेसोबत सासऱ्याचे अनैतिक संबंध; अडसर ठरणाऱ्या मुलाची बापाकडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 16:09 IST

आरोपीचे सुनेसोबत अनैतिक संबंध होते आणि यात मुलाचा अडथळा येत असल्याकारणाने त्याने मुलाचा काटा काढल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे.

ठळक मुद्देफरिदकोट जिल्ह्यातील डाबरी खाना या गावात छोटा सिंह (६२) हा त्याच्या मुलांसह राहतो. छोटा सिंहचे मोठ्या सुनेसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते.छोटा सिंहने धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले.

फरिदकोट - पंजाबमधील फरिदकोट येथे ६२ वर्षांच्या वृद्धाने सुनेसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून आपल्या ४० वर्षीय मुलाची  हत्या केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. आरोपीचे सुनेसोबत अनैतिक संबंध होते आणि यात मुलाचा अडथळा येत असल्याकारणाने त्याने मुलाचा काटा काढल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे.  छोटा सिंहने धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. हत्येनंतर त्याने मुलाच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते तुकडे एका मोठ्या पिशवीत भरून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. 

फरिदकोट जिल्ह्यातील डाबरी खाना या गावात छोटा सिंह (६२) हा त्याच्या मुलांसह राहतो. छोटा सिंहचा मोठा मुलगा ४० वर्षांचा होता. त्याचे १२ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या दाम्पत्याला मुले देखील आहेत. छोटा सिंहचे मोठ्या सुनेसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. यात मोठा मुलगा अडथळा ठरत असल्याकारणाने छोटा सिंहने दोन महिन्यांपूर्वी सुनेसाठी फरिदकोट शहर येथे भाड्याने घरही घेतले आणि सुनेशी लग्न करुन या घरात राहायला जाण्याचा निर्णय देखील त्याने घेतला होता. सासरा व सुनेमधील संबंधाची छोटू सिंहच्या पत्नीला याची माहिती होती. मात्र, छोटा सिंह कोणाचेही ऐकत नव्हता. काल रात्री छोटा सिंहचा मोठा मुलगा घरात झोपला होता. यादरम्यान छोटा सिंहने धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. हत्येनंतर त्याने मुलाच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते तुकडे एका मोठ्या पिशवीत भरले. छोटा सिंह ही पिशवी घराबाहेर फेकायला जात असताना लहान मुलाने त्याला पाहिले. पिशवीवर रक्ताचे डाग असल्याने त्याने वडिलांना याबाबत विचारले असता छोटा सिंहने मोठ्या मुलाची हत्या केल्याचे उघड झाले. कुटुंबियांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा  गुन्हा दाखल करत छोटा सिंहला जेरबंद केले आहे.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकPunjabपंजाब