शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 14:59 IST

Lawrence Bishnoi And Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सिद्दिकी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या एका आरोपीने मोठा दावा केला आहे.

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सिद्दिकी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या एका आरोपीने मोठा दावा केला आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट रचला जात असताना गुजरात जेलमध्ये असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी बोलणं झालं होतं असा दावा त्याने केला आहे. मुख्य शूटर शिवकुमार गौतम याने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली.

हत्येचा प्लॅन करताना लॉरेन्स बिश्नोईशी बोलल्याचं गौतमने अधिकाऱ्यांना सांगितलं. लॉरेन्स बिश्नोई गुजरातमधील जेलमध्ये बंद आहे. शूटरने सांगितलं की, यावेळी लॉरेन्स बिश्नोईने शूटरला आश्वासन दिलं होतं, हत्येनंतर पोलिसांना घाबरण्याची गरज नाही.

लॉरेन्स बिश्नोईने गौतमला सांगितलं होतं की, पकडले गेलात तरी घाबरू नका, काही दिवसांतच त्यांना तुरुंगातून बाहेर काढलं जाईल. शूटर गौतमने पुढे सांगितलं की, बिश्नोईने त्याला हत्येसाठी १२ लाख रुपये देण्याचं वचन दिलं होतं.

जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याला परदेशात पाठवण्याची व्यवस्था करण्याचं आश्वासनही देण्यात आलं होतं. गौतम म्हणाला, लॉरेन्स बिश्नोईने त्याला सांगितलं की त्याच्याकडे वकिलांची एक टीम आहे, जी त्याला अटक केल्यानंतर काही दिवसांत सोडवू शकते.

लॉरेन्स बिश्नोईचं नाव बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात समोर आलं आहे. यापूर्वी या प्रकरणात बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईचे नावही समोर आलं होतं. हत्येच्या कटात सहभाग असल्याच्या कारणावरून अनमोलचं नाव तपासात पुढे आलं होतं, मात्र आता या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचं नाव जोडलं गेल्याने पोलिसांच्या तपासाला नवं वळण मिळालं आहे.

१२ ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दिकी यांची मुंबईतील वांद्रे येथे मुलगा झिशान यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. बाबा सिद्दिकी यांचे अभिनेता सलमान खानशी जवळचे संबंध असल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचं या गँगने म्हटलं आहे. 

टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीCrime Newsगुन्हेगारीMumbai policeमुंबई पोलीसjailतुरुंग