शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात 'लादेन' गँग उद्ध्वस्त; स्वारगेट पोलिसांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2020 20:28 IST

Crime News : चौघांकडून ११ पिस्तुलासह ३१ काडतुसे हस्तगत : महाविद्यालयीन तरुण गुन्हेगारीत

पुणे : वानवडीतील खुनाच्या प्रयत्नातील फरार असलेल्या आरोपीकडून आणि त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन  स्वारगेट पोलिसांनी ११ पिस्तुले आणि ३१ काडतुसे असा एकूण ४ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे. या आरोपींनी विकलेल्या दोन पिस्तुलांचा वापर वानवडी आणि वेल्हे येथील गोळीबाराच्या गुन्ह्यात करण्यात आला आहे.

बारक्या ऊर्फ प्रमोद श्रीकांत पारसे (वय १९, रा. आंबेगाव पठार), राजू अशोक जाधव (वय २०, रा. माणगाव, ता़ हवेली), बल्लुसिंग करतारसिंग शिकलीगर (वय ४९, रा.निमखेडी, जि़ बुलढाणा), लादेन ऊर्फ सोहेल मोदीन आसंगी (वय २४, रा. टेल्को कॉलनी, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

याबाबत अपर पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर, उपायुक्त सागर पाटील यांनी माहिती दिली. वानवडी परिसरात काही दिवसांपूर्वी वाळु सप्लायरवर भरदिवसा गोळीबार झाला होता. त्या गुन्ह्यातील आरोपीला पिस्तुल पुरविणारा व सध्या फरार असलेल्या आरोपी बारक्या हा स्वारगेट येथील पीएमपी बसस्थानकावर मित्राची वाट पहात थांबला असल्याची माहिती स्वारगेट पोलिसांना मिळाली.

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बारक्या याला पकडले. त्याच्याकडून २ गावठी पिस्तुले आणि ४ काडतुसे जप्त करण्यात आली. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने राजू जाधव याला एकूण १३ गावठी पिस्तुल व काडतुसे विकण्यास दिल्याचे सांगितले. त्यानुसार राजू जाधव याला पकडून त्याच्याकडून १ गावठी पिस्तुल व ४ काडतुसे जप्त करण्यात आली. प्रमोद व राजू यांनी त्याच्या ओळखीच्या लादेन याला ४ पिस्तुले विकल्याचे सांगितले. त्यावरुन पोलिसांनी लादेन याला पकडून त्याच्याकडून ३ पिस्तुल व ८ काडतुसे जप्त केली. त्याने राजू जाधव याच्याबरोबर बुलढाणा येथे जाऊन बल्लुसिंग शिकलीगर याच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शिकलीगर याला अटक केली़.

लादेन याने त्यातील पिस्तुल संदीप धुमाळ याला विकल्याचे सांगितले़ धुमाळ याने वेल्ह्यामध्ये त्यामधून गोळीबार केला होता़ त्याला ग्रामीण पोलिसांनी पकडले असून पिस्तुल जप्त केले आहे़ राजू आणि बारक्या हे दोघेही महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत़ राजू याचे नातेवाईक बुलढाणा जिल्ह्यातील निमखेडा येथे राहणारे आहेत़ तेथे त्यांची शिकलीगर याच्याशी ओळख झाली होती़ त्यातून त्यांनी त्याच्याकडून पिस्तुले आणून येथे दुप्पट किमंतीला विकली होती़ ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी, उपनिरीक्षक सुरेश जायभाय, हवालदार महेंद्र जगताप, पंढरीनाथ शिंदे, अरुण पाटील, रामचंद्र गुरव, विजय कुंभार, विजय खोमणे, महेश बारवकर, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, सचिन दळवी, अमित शिंदे, वैभव शितकाल, महेश काटे, भूषण उंडे, बाबासाहेब शिंदे, शंकर गायकवाड यांनी केली़

भविष्यात अनेक गुन्हे टाळणारी कारवाईबुलढाण्यातून आणून विकलेल्या ११ पिस्तुलांपैकी २ पिस्तुलांचा प्रत्यक्ष गोळीबारात वापर करण्यात आल्याचे या तपासातून  निष्पन्न झाले आहे़ हे पाहता स्वारगेट पोलिसांनी चौघा आरोपीकडून पकडलेली ११ पिस्तुले आणि ३१ काडतुसे ही मोठी कारवाई ठरली आहे़ जप्त केलेल्या या पिस्तुलातून आणखी काही ठिकाणी भविष्यात वापर होऊन त्यातून काही गुन्हे घडण्याची शक्यता होती़ तसेच या पिस्तुलांचा धाक दाखवून लोकांना लुबाडण्याचे गुन्हे होण्याची शक्यता होती़ त्यामुळे या कारवाईने शहरातील अनेक गुन्हे व काही जणांचे जीव वाचले आहेत़

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस