शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
2
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
3
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
4
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
5
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
6
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
7
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
8
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
9
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
10
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
11
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
12
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
13
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
14
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
15
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
16
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
17
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
18
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
19
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स

लघु उद्योगाचे आमिष दाखवून १४ महिलांना लावला लाखोंचा चुना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 21:30 IST

Fraud : सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्देयाबाबत वत्सला रमेश पाटील (५९,रा.आदर्श नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संगीता नीरज जोशी, नीरज जोशी व जागृती जोशी हे १५ वर्ष वत्सला पाटील यांच्या घरात भाड्याने वास्तव्याला होते

जळगाव : लघु उद्योग सुरु करण्यासह पैशाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या नावाने बचत गट स्थापन करुन १४ महिलांची १३ लाख ५० हजार २५० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी संगीता नीरज जोशी, नीरज जोशी, जागृती नीरज जोशी, संतोष जयनारायण शर्मा व संजय जयनारायण शर्मा (सर्व रा.सांगवी, ता.शिरपुर, जि.धुळे) यांच्याविरुध्द गुरुवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वत्सला रमेश पाटील (५९,रा.आदर्श नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संगीता नीरज जोशी, नीरज जोशी व जागृती जोशी हे १५ वर्ष वत्सला पाटील यांच्या घरात भाड्याने वास्तव्याला होते, त्यामुळे त्यांचे घरोब्याचे संबंध होते. या संबंधातून सून कामिनी रामकृष्ण पाटील यांच्याकडून जोशी परिवाराला मेडीकल दुकानातील साहित्यासाठी १५ हजार रुपये दिले होते, ही बाब सासूला माहित नव्हती, त्यानंतर संगीता जोशी हिने पुन्हा वत्सला पाटील यांच्याकडून त्याच कामासाठी ५ जुलै २०१९ रोजी ५० हजार रुपये घेतले. पुन्हा त्याच कारणासाठी ७ डिसेंबर २०१९ रोजी अडीच तोळ्याचे सोन्याचे लॉकेट खासगी फायनान्स येथे तारण ठेवून ६४ हजार ३७५ रुपये संगीता जोशी हिने घेतले. त्यासाठी जोशी हिचा भाचा अंकीत शर्मा याने ५० व ४० हजाराचे दोन धनादेश दिले. आमच्याकडे पेट्रोल पंप असून खूप पैसे आहेत, तुम्हाला रोख पैसे देऊ, तुम्ही धनादेश बँकेत टाकू नका असे सांगितले. त्यामुळे पाटील यांनी हे धनादेश बँकेत जमा केले नाहीत.त्यानंतर फेब्रवारी २०२० मध्ये जोशी परिवार घराला कुलुप लावून निघून गेले. त्यानंतर त्यांनी महिलांना उद्योग देण्याच्या नावाखाली महिलांच्या नावावर वेगवेगळ्या फायनान्सकडून कर्ज काढले व त्यांची फसवणूक केली.

यांची झाली फसवणूकवत्सला रमेश पाटील (रा.आदर्श नगर),कामिनी रामकृष्ण पाटील (रा.आदर्श नगर),रत्ना ज्ञानेश्वर बारी (रा.मकरा पार्क), संध्या दिलीप घोडेस्वार (रा.मकरा पार्क), मथुराबाई भरतसिंग भोपाळावद (रा.मोहाडी रोड), कल्पना विजय नाथ (रा.शिरसोली नाका), कामिनी रामकृष्ण पाटील (रा.मकरा पार्क), सुवर्णा भुपेंद्र वानखेडे (रा.मकरा पार्क), विजया भास्कर वानखेडे (रा.मकरा पार्क), सायराबी समीर पठाण (रा.आदर्श नगर), रोशन बी शब्बीर खान (रा.शिरसोली नाका), आरेफा बी युनुस खा पठाण (रा.आदर्श नगर), सीमा चंद्रकांत सोनवणे (रा.शिरसोली रोड) व फैमादाबी शाकीर खा पठाण (रा.आदर्श नगर) आदींची एकूण १३ लाख ५० हजार २५० रुपयात फसवणूक झाली आहे. वेगवेगळ्या बचत गटाच्या नावाने वेगवेगळ्या फायनान्सकडून त्यांनी या महिलांच्या नावाने कर्ज काढून स्वत: लाटले आहे.

 

उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यात एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. येथे सहजनवान पोलिस स्टेशन परिसरातील घाससरा चौकी प्रभारी पोस्टमधील एक अल्पवयीन मुलगा व मुलगी मदत व लग्न मिळवून देण्यास प्रभारी आहे. आत्तापर्यंत तो दोघेही प्रौढ असल्याच्या व्हिडिओचा संदर्भ देत होते, पण आता काही कागदपत्रे समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आणि मुलीला ताब्यात घेतले. दुसरीकडे एसएसपीने संपूर्ण प्रकरणाची चौकशी एएसपीकडे सोपविली आहे. तपासाच्या आधारे कारवाई केली जाईल असे एसएसपीचे म्हणणे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीपासूनच एक मुलगी घरातून बेपत्ता होती. नंतर तिने प्रियकरासह पोलिस चौकी गाठली असल्याचे उघड झाले. त्या दोघांनीही म्हटलं होतं की ते प्रौढ आहेत. असा आरोप आहे की चौकी प्रभारीने दोघांचे लग्न केले. जेव्हा मुलीच्या आईने पोलिसात अल्पवयीन मुलीचा पोस्टमध्ये लग्न केल्याचा आरोप केला तेव्हा ही बाब अधिका the्यांपर्यंत पोहोचली. त्या इन्स्पेक्टरने कागदपत्रे मागितली होती, जेणेकरून ती मुलगी प्रौढ आहे की नाही याची पुष्टी केली जाऊ शकते, परंतु असे दिसून आले की तिने आपला अभ्यास सोडला आहे, ज्यामुळे कागदपत्रे सापडली नाहीत. जुन्या कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी त्याच्यावर अल्पवयीन असल्याचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एसएसपी जोगेंद्र कुमार यांनी सांगितले की कागदपत्रे मागितली गेली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुलीला तिच्या घरी रहायचे नाही. वैद्यकीय त्याचे वय निश्चित करेल. ती वयस्क असल्यास, त्यानुसार पोलिस कारवाई करतील, परंतु एखादी अल्पवयीन असल्यास आरोपींविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल. एएसपी पोलिसांच्या भूमिकेचा शोध घेत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसJalgaonजळगावArrestअटक