शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

मुंबईतून लाखोंच्या बनावट नोटा जप्त, तामिळनाडूतून आरोपी जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 15:01 IST

१ लाख २८ हजार ६०० रुपयांच्या एकूण १५१ बनावट नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या.  

ठळक मुद्देया माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला आणि कारवाईत भास्कर मुर्गन नाटर (४३) याची अंगझडती घेतली.तामिळनाडूतील अय्यानुर, तालुका अंबूर, जिल्हा तिरुपूथुर येथे सर्वनन (४५) याच्या राहत्या घरी या पोलीस पथकाने धड टाकली.

मुंबई - मुंबईपोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष - ४ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांना ३ मार्चला सायन सर्कल येथील बँक ऑफ बडोदाच्या बाजूला एक इसम बनावट भारतीय चलनातील नोटा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला आणि कारवाईत भास्कर मुर्गन नाटर (४३) याची अंगझडती घेतली. त्यावेळी पोलिसांनी त्याच्या ताब्यातून २ हजार, पाचशे आणि दोनशेच्या रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. १ लाख २८ हजार ६०० रुपयांच्या एकूण १५१ बनावट नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या.  याबाबत सायन पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ४८९ (ब) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत हस्तगत करण्यात आलेल्या बहुतांश नोटांचे सिरीयल नंबर एकच असल्याचे दिसून आले होते. काही ठराविक नोटांचा वापर करून त्यावरून इतर बनावट नोटा बनवल्या जात असाव्यात असा संशय होता. याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी भास्कर नाटर यांच्याकडे बारकाईने चौकशी केली असता त्याच्याविरुद्ध अँटॉप हिल पोलीस ठाण्यात २०११ साली भा. दं. वि. कलम ३९३, ४५२, ३४ अन्वये गुन्हा दाखल होता असल्याची माहिती उघड झाली. तो मुंबईस येण्यासाठी निघाला असताना बनावट नोटा तामिळनाडूतील सर्वनन वनियार याने मुंबईतील एका इसमाला देण्यासाठी त्याच्याकडे दिल्या असल्याची माहिती त्याने तपासात दिली.आरोपीने दिलेल्या माहितीवरून कक्ष - ४ चे एक पथक तामिळनाडूत दाखल झाले. तामिळनाडूतील अय्यानुर, तालुका अंबूर, जिल्हा तिरुपूथुर येथे सर्वनन (४५) याच्या राहत्या घरी या पोलीस पथकाने धड टाकली. त्यावेळी त्याच्याकडे ५०० रुपयांच्या १४७६ आणि २०० रुपयांच्या ८५ नोटा असा ऐकून ७ लाख ५५ हजार किंमतीच्या बनावट नोटा आढळून आल्या. याप्रकरणी यापूर्वी हस्तगत केलेल्या १ लाख २८ हजार ६०० रुपयांच्या नोटा मिळून आतापर्यंत ८ लाख ८३ हजार ६०० रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या.तामिळनाडूत टाकलेल्या छाप्यात बनावट नोटा तयार कारण्यासाटःई वापरण्यात येणारे एक स्कॅनर कम प्रिंटर, पेपर कटर, कात्री, हिरवट रंगाचा प्लास्टिक रोल इत्यादी साहित्य मिळून आले. आरोपी भारतीय चलनातील नोटा स्कॅन करून त्यांच्या प्रिंट आउट्स घेत असल्याचे आणि त्यानंतर हिरवट रंगाच्या प्लास्टिक रोलचे तुकडे नोटेवर चिटकवून सिक्युरिटी थ्रेड तयार करत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. भास्कर आणि सर्वनन हे दोघेही तामिळनाडूचे राहणारे आहे.

टॅग्स :ArrestअटकMumbaiमुंबईPoliceपोलिसTamilnaduतामिळनाडू