शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

'तो मला भेटू देत नव्हता...' पत्नीने प्रियकरासाठी उचलले टोकाचे पाऊलं, घटनाक्रम ऐकून पोलिसही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 14:56 IST

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे, पत्नीने पतीची धक्कादायक पद्धतीने हत्या केली. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा कुऱ्हाडीने वार करून मृतदेह रस्त्याच्या कडेला पुरला. तब्बल 11 दिवसांनी मृतदेह सापडल्यानंतर ही भयंकर घटना उघडकीस आली. पोलिसांनी हत्येचा आरोप असलेल्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण लखीमपूर खेरी येथील निघासन कोतवाली परिसरातील बौद्ध पूर्वा गावातील आहे. 11 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इंग्लिश (28) या तरुणाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पुरलेला आढळून आला. सिंगाही व निघासन लिंक परिसरात लोकांना विचित्र वास येत होता. यावर लोकांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून रस्त्याच्या कडेला खोदकाम सुरू केले असता त्यांना गळा कापलेला अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या मृतदेहाची ओळख काही वेळाने समोर आली. तो तरुण बुढी पूर्वा येथील तरुण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

गेल्या 11 दिवसांपासून तरुण घरातून बेपत्ता होता. नातेवाईक त्याचा शोध घेत होते मात्र त्याचा काहीही पत्ता लागला नाही. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, संशय इंग्लिशची पत्नी ज्युली हिच्यावर आला. पोलिसांनी ज्युलीची चौकशी सुरू केली. पत्नीने पोलिसांना माहिती दिली नाही, पण अधिक चौकशीनंतर पत्नीने पोलिसांना संपूर्ण माहिती सांगितली. संपूर्ण घटनाक्रम ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. पती पत्नी जुलीला  तिच्या प्रियकराला भेटण्यापासून अडवत होता. त्यामुळेच तिने प्रियकराच्या मदतीने कुऱ्हाडीने वार केले. हत्येनंतर मृतदेह रस्त्याच्या कडेला नेऊन पुरण्यात आला.

चिमुकल्याच्या प्रायव्हेट पार्टला मित्रांनी बांधला दोरा, न्यावं लागलं हॉस्पिटलमध्ये, त्यानंतर…

पत्नीने पतीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले,  मृताचे काका मेवालाल यांनी पोलिसांत पत्नीविरोधात तक्रार दिली. पुतण्या 11 दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. नातेवाइकांनी सतत त्याचा शोध घेतला मात्र त्याचा कोणताही सुगावा लागला नाही. आता त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पुरलेला आढळून आला आहे. त्याच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करण्यात आले आहेत. पुतण्याची हत्या झाला असल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस