शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

मुस्काटात मारून जमिनीवर आपटलं, केस ओढून खेचत खेचत नेले, आईला वाचवण्यासाठी लेक सरसावली पण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 18:43 IST

Lady Police Constable Beats to Women : एका पोलिस कर्मचाऱ्याने तिच्या मुलीला शिवीगाळ केली आणि ढकलले.

ठळक मुद्दे सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील आहे. ही महिला सागर जिल्ह्यातील रहिरहाली ब्लॉकमधील खेड्यातून काही कामानिमित्त राहळी येथे पोहोचली होती.

सागर - मास्क घातला नाही म्हणून त्याची इतकी भयानक शिक्षा दिली जेणेकरुन मानवतेला लाज वाटेल. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये लेडी कॉन्स्टेबलने एका महिलेबरोबर निर्दयतेची मर्यादा ओलांडली आहे. मास्क न घातल्याने पोलिसांच्या जीपमधून जबरदस्तीने तिलाताब्यात घेतले. महिलेने विरोध दर्शविला तेव्हा लेडी कॉन्स्टेबलने तिला मारहाण करण्यास सुरवात केली. एका पोलिस कर्मचाऱ्याने तिच्या मुलीला शिवीगाळ केली आणि ढकलले.सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील आहे. ही महिला सागर जिल्ह्यातील रहिरहाली ब्लॉकमधील खेड्यातून काही कामानिमित्त राहळी येथे पोहोचली होती. महिलेने मास्क घातला नव्हता आणि मुलीच्या तोंडाला स्कार्फ बांधलेला होता. दरम्यान, तपासणी दरम्यान पोलिसांनी गांधी चौक जवळ त्यांना पकडले. मास्क न घातल्याबद्दल महिलेने पोलिसांशी वाद घातला. त्यानंतर महिला पोलीस कॉन्स्टेबलने महिलेला पोलिसांच्या जीपमध्ये बसविले.महिलेची मुलगी थांबण्यासाठी गेली असता पोलिसांनी तिला तेथून ढकलले. त्यानंतर महिला पोलिसांनी जीपमध्ये बसण्यास नकार दिला. महिला कॉन्स्टेबलने संतापाच्या भरात तिला मारहाण करण्यास सुरवात केली. महिला पोलीस कॉन्स्टेबलने महिलेवर जोरदार कानशिलात मारली. यावेळी, महिलेची मुलगी आईला वाचविण्यासाठी जवळ गेली. त्यावेळी एका पोलिसाने तिला शिवीगाळ केली. महिला पोलीस कॉन्स्टेबलने रस्त्यावर फटकारले आणि महिलेला रस्त्यावर उतरवले. त्यानंतर, तिने तिचे केस पकडले आणि खेचून फरफटत ओढू लागली. यावेळी पोलिसांचा संपूर्ण फौजफाटा चहुबाजूंनी तिला घेरून ठेवले. अमानुषतेचा हा संपूर्ण व्हिडिओ कुणीतरी बनवला आहे, तो व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मास्क न घालण्याची शिक्षा इतकी भयानक आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोना कर्फ्यू मोडणार्‍या लोकांवर प्राणघातक हल्ला करु नका असा इशाराही मध्य प्रदेशात कोर्टाने पोलिसांना दिला आहे. परंतु, दोषी पोलिसांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. पोलिसांनी सांगितले की, महिलेने लेडी कॉन्स्टेबलला मारहाण केली. व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसते आहे की, केवळ महिला कॉन्स्टेबलच या महिलेवर अत्याचार करत आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसWomenमहिलाMadhya Pradeshमध्य प्रदेशCourtन्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या