शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा जाधव खूनप्रकरणी फरारी आरोपी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 01:42 IST

मटका व्यावसायिक कृष्णा ऊर्फ नाना महादेव जाधव खूनप्रकरणी फरारी आरोपींपैकी एका आरोपीला जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

बारामती  - शहरातील मटका व्यावसायिक कृष्णा ऊर्फ नाना महादेव जाधव खूनप्रकरणी फरारी आरोपींपैकी एका आरोपीला जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गणेश विठ्ठल माने (वय ३२, व्यवसाय मजुरी, रा. कैकाडी गल्ली, बारामती, ता. बारामती, जि. पुणे) असे या आरोपीचे नाव आहे. ५ नोव्हेंबर २०१८ रोजी कृष्णा जाधव याचा धारदार हत्याराने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आला होता.याबाबत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी माहिती दिली. त्यानुसार गतवर्षी ५ नोव्हेंबरलाकृष्णा जाधव याचा दिनेश रावसाहेब वायसे, विनोद शिवाजी माने, गणेश विठ्ठल माने, अनिल संभाजी माने, सुनील संभाजी माने, प्रेम दिनेश वायसे, अविनाश जाधव, संदीप जाधव, चिमी ऊर्फ वैष्णवी अशोक जाधव, रवी माकर, मोठ्या बिट्या ऊर्फ सचिन रमेश जाधव, लोकेश परशुराम ऊर्फ दत्तात्रय माने, गुलाब उत्तम माने यांना खंडणी दिली नाही. त्यामुळे सर्वांनी संगनमत करून कट रचून धारदार हत्याराने कृष्णा जाधव याचा निर्घृणपणे खून केला होता.हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आदेश दिले होते. या गुन्ह्यातील आरोपी गणेश विठ्ठल माने माळेगाव (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथील एका कंपनीत कामास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याला अटक करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, पोलीस नाईक गुरू गायकवाड, पोलीस नाईक सुभाष राऊत, पोपट गायकवाड, सचिन गायकवाड, अक्षय नवले यांच्या पथकाने माहिती काढली. त्यानंतर त्या ठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेतला. यावेळी गणेश विठ्ठल माने (वय ३२, व्यवसाय मजुरी, रा. कैकाडी गल्ली, बारामती, ता. बारामती, जि. पुणे) (मौजे माळेगाव, ता. सिन्नर, जि. पुणे) येथील इंडियन पॉलिमर कंपनी येथे मिळून आला. त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी