शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महागडे गिफ्ट देत नसल्यानं केला ब्रेकअप; युवकानं घडवली गर्लफ्रेंडला अद्दल, पोलीस हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 17:25 IST

कोलकाताच्या एका नॅशनल बँकेच्या लेक टाऊन ब्रांचमध्ये काम करणारी युवती नादिया जिल्ह्यात राहणाऱ्या युवकासोबत रिलेशनशिपमध्ये होती

कोलकाता - गर्लफ्रेंडशी ब्रेकअप झाल्यानंतर एका युवकानं खुन्नस काढण्यासाठी असं काही कांड केला ज्यानं एक्स गर्लफ्रेंडचं जगणं मुश्किल झालं. महागडं गिफ्ट देत नाही म्हणून युवतीने बॉयफ्रेंडशी नाते तोडले. त्यानंतर प्रेमात विश्वासघात मिळालेल्या बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडच्या घरी कॅश ऑन डिलिवरीचे ऑर्डर तिच्या घरी पाठवणे सुरू केले. ४ महिन्यात अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून तिच्या घरी ३०० हून जास्त ऑर्डर आल्या. प्रत्येकवेळी गर्लफ्रेंड ती ऑर्डर रिटर्न करत राहिली. अखेर या दोघांनाही ई कॉमर्स कंपन्यांनी ब्लॅकलिस्ट केले. एक्स बॉयफ्रेंडच्या या कारनाम्याला कंटाळून युवतीने पोलीस तक्रार दिली आहे.

नोव्हेंबरपासून सुरू झाली पार्सल पाठवण्याची मालिका

कोलकाताच्या एका नॅशनल बँकेच्या लेक टाऊन ब्रांचमध्ये काम करणारी युवती नादिया जिल्ह्यात राहणाऱ्या युवकासोबत रिलेशनशिपमध्ये होती. काही महिन्यापूर्वी या दोघांमध्ये ब्रेकअप झाला. त्यानंतर एक्स बॉयफ्रेंडने तिला धडा शिकवण्यासाठी अजब युक्ती लढवली. मागील नोव्हेंबर महिन्यापासून ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांच्या माध्यमातून युवतीच्या घरी त्याने महागडे पार्सल पाठवले. प्रत्येक ऑर्डर ही कॅश ऑन डिलिवरी होती. ज्यामुळे सातत्याने युवतीला ते रिटर्न करावे लागत होते. युवकाने जवळपास ३०० हून अधिक COD ऑर्डर तिच्या घरी पाठवल्याचे तपासात पुढे आले.

महागडे गिफ्ट हवे होते, म्हणून...

युवतीने पोलीस तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यात युवतीच्या घरी ऑर्डर पाठवणारा तिचा एक्स बॉयफ्रेंड सुमन सिकदर असल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपीला अटक करून चौकशी केली तेव्हा अधिकाऱ्यांनी डोक्यावर हात मारला. सुमन युवतीसोबत बदला घेण्यासाठी नवनवीन नंबरवरून मेसेज पाठवून तिला त्रास द्यायचा. गर्लफ्रेंडला ऑनलाईन शॉपिंग खूप आवडायची. ती कायम बॉयफ्रेडकडे महागड्या वस्तूची डिमांड करत होती. जेव्हा ही डिमांड पूर्ण केली नाही तेव्हा गर्लफ्रेंडने त्याच्याशी नाते तोडले. त्यामुळे तिला धडा शिकवण्यासाठी युवकाने ही शक्कल लढवली जेणेकरून तिला महागडे गिफ्ट खरेदी करण्यासाठी किती खर्च होतो हे कळावे असं त्याने पोलिसांना सांगितले.

दरम्यान, युवकाने कॅश ऑन डिलिवरीवाले मोबाईल, टॅबलेटसह अन्य महागडे गिफ्ट पाठवले होते. नोव्हेंबरपासून हे सुरू होते. फेब्रुवारीच्या व्हेलन्टाईन आठवड्यात प्रत्येक दिवशी विविध प्रोडक्ट घरी यायचे. हा सिलसिला मार्चपर्यंत कायम होता. जेव्हा अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांनी युवतीला ब्लॉक केले तेव्हा ती पोलिसांकडे पोहचली. बुधवारी या युवकाला पोलिसांनी अटक करून कोर्टात हजर केले तेव्हा कोर्टाने त्याला जामीन दिला. 

टॅग्स :Policeपोलिस