शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कोलकाता केस : "रेपनंतर ती ओरडत होती, म्हणून..."; त्या रात्री लेडी डॉक्टरला कसं मारलं? आरोपी संजयनं स्वतःच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 10:42 IST

मुख्य आरोपी संजय रॉयने (Sanjay Roy) चौकशी दरम्यान आपला गुन्हा कबूल केल्याचे समजते. याच बरोबर त्याने बलात्कारानंतर हत्या का केली? याचे कारणही सांगितले आहे.

कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मध्ये ट्रेनी महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्येनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे. या प्रकरणात रोजच्या रोज नवनवे खुलासे होत आहेत. यातच आता मुख्य आरोपी संजय रॉयने (Sanjay Roy) चौकशी दरम्यान आपला गुन्हा कबूल केल्याचे समजते. याच बरोबर त्याने बलात्कारानंतर हत्या का केली? याचे कारणही सांगितले आहे. संबंधित घटना  8-9 ऑगस्टच्या रात्री रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये घडली होती. 

आरोपीने बलात्कारानंतर का केली लेडी डॉक्टरची हत्या? -माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी सजंय रॉयने चौकशीदरम्यान कबूल केले होते की, बलात्कारानंतर सातत्याने ओरडत असल्याने त्याने पीडितेची हत्या केली. ट्रेनी डॉक्टर सातत्याने ओरडत होती. म्हणून संजय रॉयने तिचा गळा दाबला आणि तिचा मृत्यू झाला.

संजय रॉय चांगला बॉक्सर होता, असेही बोलले जात आहे. कदाचित यामुळेच पीडितेला त्याच्या हातून स्वतःचा बचाव करता आला नाही. पीडितेने स्वतःचा बचाव करण्यासाठी आरडाओरडही केली. संजय रॉयने पकडले जाण्याच्या भीतीने तिची संपूर्ण ताकदीने गळा दाबून हत्या केली. संजय रॉयने त्यांच्या मेडिकल दरम्यान याचा खुलासा केला होता. याशिवाय, रविवारी आरोपी संजयची पॉलीग्राफ टेस्टदेखील करण्यात  आली होती.

8-9 ऑगस्टच्या रात्री काय घढल? -कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये 8-9 ऑगस्टच्या रात्री ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार झाला आणि तिची हत्या करण्यात आली. ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाली सेमिनार हॉलमध्ये आढळून आला होता. मृतदेह आढळण्याच्या काही तास आधीच ती आपली 36 तासांची शिफ्ट करून आराम करण्यासाठी हॉलमध्ये गेली होती.

तिच्या शवविच्छेदनात 16 बाह्य आणि 9 अंतर्गत जखमा आढळून आल्या. सीसीटीव्ही फुटेजनुसार, संजय रॉय 9 ऑगस्टला पाहाटे 4.03 वाजता रुग्णालयात दाखल झाला होता. 8 ऑगस्टला तो चेस्ट डिपार्टमेंटमध्ये गेला होता आणि कॅमेऱ्यात पीडित डॉक्टर आणि इतरांना टक लावून बघताना दिसून आला होता. कोलकाता पोलिसांनी ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह आढळल्यानंतर, दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 ऑगस्टला संजय रॉयला अटक केली होती.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालdoctorडॉक्टरcollegeमहाविद्यालयhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूPoliceपोलिस