शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

परदेशी महिलेनं प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं होतं २ किलो सोनं, 'असं' आलं उघडकीस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 12:04 IST

कोलकातातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी एक आश्चर्यकारक घटना उघडकीस आली आहे.

कोलकाता

कोलकातातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी एक आश्चर्यकारक घटना उघडकीस आली आहे. सीमाशुल्क अधिकारी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करत होते. कोलकाता विमानतळावर उतरल्यानंतर नेहमीप्रमाणे तपासणी सुरू होती. एक महिला सुदानहून परतत होती, मात्र ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकांना महिलेचे वागणे संशयास्पद वाटले. झडतीनंतर सुरक्षा अधिकाऱ्यांना धक्काच बसला. परदेशी महिलेनं आपल्या अंतवस्त्र आणि प्रायव्हेट पार्ट सोनं लपवलं होतं. एकूण १,९३० ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं आहे. त्याची बाजारभावानुसार ९६ लाख १२ हजार ४४६ रुपये इतकी किंमत आहे.

सुरक्षा कर्मचारीही चक्रावून गेले. महिलेच्या शरिरात सोनं दडल्याचीही शंका उपस्थित करण्यात आली आहे. या महिलेला अटक करण्यात आली असून तिची चौकशी सुरू आहे. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.

परदेशी महिलेनं प्रायव्हेट पार्ट आणि अंतवस्त्रात दडवलं सोनंविमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदानी नागरिक लामिस अब्देलराजेग शरीफ शनिवारी संध्याकाळी ७.१८ वाजता कोलकाता विमानतळावर उतरल्या. त्यानंतर विमानतळावर नियुक्त इमिग्रेशन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी व्हिसासाठी त्याचा पासपोर्ट तपासला. नंतर त्यांनी कोलकात्यात येण्याची परवानगी दिली. परवानगी घेतल्यानंतर महिला प्रवाशानं विमानतळाचा ग्रीन चॅनल ओलांडला. त्यानंतर कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांना महिलेच्या वागणुकीवर संशय आला. यानंतर त्यांनी महिलेला अटक केली. त्यानंतर विचारपूस सुरू झाली. चौकशीत तफावत आढळल्यानं महिला अधिकाऱ्यांनी तिची झडती घेतली. त्यानंतर सोनं सापडलं. अंतवस्त्रात दोन पाकिटं सापडली. यात सोनं लपवण्यात आलं होतं. 

शरीरात सोनं लपवल्याचा संशय, तपासणी सुरूतपास करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या प्रायव्हेट पार्टजवळ सोन्याची पावडर असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर महिलेच्या प्रायव्हेट पार्टमधून सोन्याच्या पावडरनं भरलेल्या दोन कॅप्सूल जप्त करण्यात आल्या. महिलेची चौकशी केली असता तिच्या शरीरात आणखी कॅप्सूल असल्याचं कस्टम अधिकाऱ्यांना समजलं. त्यानंतर त्यांना व्हीआयपी रोडवरील खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, तिथं त्यांची तपासणी करण्यात आली. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतवस्त्रातून एकूण 1,930 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. त्याची बाजारभाव 96 लाख 12 हजार 446 रुपये आहे. सोन्याच्या किमती वाढल्यानंतर कोलकाता आणि देशाच्या इतर भागात सोन्याची तस्करी वाढली आहे. अलीकडेच भारत-बांगलादेश सीमेवर बीएसएफच्या जवानांनी मोठ्या प्रमाणात तस्करी केलेलं सोनं पकडलं होतं.

टॅग्स :GoldसोनंCrime Newsगुन्हेगारी