शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: कोल्हापूर: पोलीस लाईनमध्ये महिला कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 17:51 IST

Kolhapur Crime News: शनिवारी त्या पुण्याला पीएसआय परीक्षा देऊन रात्री घरी परतल्या. त्यावेळी पती विकास मित्राच्या लग्नकार्यासाठी बाहेरगावी गेले होते. रात्रीच योगिणीने वडीलांशी फोनवर चर्चा केली.

कमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मुल होत नसल्याने पती व सासूकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात कार्यरत असणाऱ्या महिला पोलिस कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आत्महत्या केली. योगिणी सुकुमार पोवार (वय ३२ रा. पोलीस लाईन कसबा बावडा. मुळ गाव- पिंपळगाव, ता कागल) असे त्यांचे नाव आहे. कसबा बावडा पोलीस लाईनमधील रुम नंबर १८ मध्ये ही घटना रविवारी दुपारी उघडकिस आली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, योगिणी पोवार यांचे सासरचे नाव योगिणी विकास कांबळे असे आहे. २०११ मध्ये त्या कोल्हापूर पोलीस दलात भरती झाल्या. सद्या त्या पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत होत्या. पाच वर्षापूर्वी त्यांचा मुंबईस्थित मामेभाऊ विकास कांबळे (मुळ रा. भाटणवाडी, ता. करवीर) याच्याशी विवाह झाला. विकास हे सध्या खासगी कंपनीत नोकरीस आहेत.

काही दिवसांपासून त्यांचा पती विकास कांबळे याच्याशी वारंवार वाद होत होता. शनिवारी त्या पुण्याला पीएसआय परीक्षा देऊन रात्री घरी परतल्या. त्यावेळी पती विकास मित्राच्या लग्नकार्यासाठी बाहेरगावी गेले होते. रात्रीच योगिणीने वडीलांशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस लाईनमध्ये घरात लोखंडी ॲंगलला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, शाहुपूरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस दलात खळबळ उडाली.

घटनास्थळी ‘सुसाईड नोट’आत्महत्या करण्यापूर्वी योगिणी पोवार यांनी घरी लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली. मुल होत नसल्याने पती व सासूकडून वारंवार मानसिक व शारिरिक छळ होत आहे, या त्रासाला कंटाळून जीवन यात्रा संपवत असल्याचे तिने चिठ्ठीत लिहून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले.

तिने रविवारी घेतली होती रजारविवारी सकाळी वडिलांसोबत लग्नाला बाहेरगावी जाणार असल्याने त्यांनी किरकोळ रजा घेतली होती. लग्नाला जाण्यासाठी तिचे वडील सुकुमार पोवार हे सकाळपासून तिला फोन करत होते, फोन न उचलल्याने ते मित्रासह थेट तिच्या पोलीस लाईनमधील घरी पोहचले. त्यावेळी त्यांच्या घरचा दरवाजा आतून बंद होता. शेजारील महिला पोलिसाच्या मदतीने त्यांनी घराची खिडकी उघडून पाहिली, त्यावेळी आतमध्ये त्याचा मृतदेह लटकत असल्याचे दिसले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस