शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

हे मूल माझं नाही! बापाच्या डोक्यात शिरलं संशयाचं भूत; चिमुकल्याची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 15:14 IST

वारणा कापशी बालक खून प्रकरणाचा तपास पूर्ण; अवघ्या ४८ तास आरोपी बाप जेरबंद

कोल्हापूर : पत्नीचे चारित्र्य आणि आपले अपत्य नसल्याच्या संशयावरुन अतिशय थंड डोक्याने ‘आरव’ या बालकाचा जन्मदात्या बापानेच खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अवघ्या ४८ तासात पोलिसांनी चिमुकल्याचा कर्दनकाळ ठरलेल्या राकेश सर्जेराव केसरे (वय २६, रा. वारणा कापशी) या बापालाच बेड्या ठोकल्या.

वारणा कापशी (ता. शाहुवाडी) येथील दि. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी बेपत्ता झालेल्या आरव केसरे (वय ६) याचा मृतदेह मंगळवारी सापडला.राकेश व साधना यांचा प्रेमविवाह होऊन त्यांना अपत्य झाले. पुढील तीन वर्षात ‘आरव’ हे दुसरे अपत्य झाले. पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन ‘आरव’ हे अपत्य आपले नसल्याची भावना राकेशची होती. त्यातून खुनाचा कट रचला. दि. ३ रोजी पती - पत्नीत वाद झाला, पत्नी रागात शेजाऱ्यांकडे गेली. दोघेच घरी असल्याने राकेशने आरवच्या छातीवर कोपराचा जोरदार ठोसा मारुन निपचीत पाडले. घरामागील पडक्या घरात नेऊन त्याचा गळा आवळला. तेथेच कोबडे कापण्यासाठी खोदलेल्या चरात ‘आरव’चा मृतदेह कडब्याच्या पेंड्यांखाली लपवला व बेपत्ताचा कांगावा केला, दुसऱ्या दिवशी रात्री मृतदेह काढून घराबाहेर टाकला.गुन्ह्याचा घटनाक्रम...०३ ऑक्टोबरदुपारी ४.०० वा. : चारित्र्याच्या संशयावरुन पती-पत्नीत वाद.सायं ४.३० वा. : राकेशने आरवला मारुन पडक्या घरात लपवले.साय. ५.३० वा. : राकेश हाॅटेल मालकासह कामासाठी गेला.साय. ७ वा. : घरी फोन करुन पत्नीच्या प्रकृतीची दोनवेळा चौकशी.रात्री ८ वा. : ‘आरव’ बेपत्ताची बांबवडे पोलिसात तक्रार०४ ऑक्टोबर : बापू गायकवाड याच्या दुकानातून राकेशने नारळ, लिंबू, गुलाल, हळद, कुंकू खरेदी केले.रात्री १०.३० वा. : पडक्या घरातून मृतदेह बाहेर टाकला. गुलाल, हळद, कुंकू टाकून नरबळीची दिशाभूल.०५ ऑक्टोबर :पहाटे ५.३० वा. : शेजाऱ्यांच्या दारात ‘आरव’चा मृतदेह आढळला. पोलीस तैनात०६ ऑक्टोबर : दिवसभरात अनेकांकडे चौकशीसायं. ६ वा. : राकेश केसरे ताब्यात.रात्री ८ वा. खुनाची कबुली.कौशल्यपूर्ण तपासाचे शिलेदार, २५ हजारांचे बक्षीसपोलिसांनी कौशल्याने खून उघड केला. सायबर क्राईमचे पो. नि. शशिराज पाटोळे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहा. पो. नि. किरण भोसले, पोलीस हिंदुराव केसरे, महिला दक्षताच्या सहा. पो. नि. श्रध्दा आंबले हे तपासाचे शिलेदार ठरले. त्यांना पोलीस उपअधीक्षक रवींद्र साळोखे, पो. नि. विजय पाटील यांचे सहकार्य लाभले. पोलीस केसरे हे संशयिताचे भाऊबंद असून, त्याच गावात राहतात. त्यांची गुन्हा उकल होण्यास मोलाची मदत लाभली. तपास पथकाला अधीक्षक बलकवडे यांनी २५ हजाराचे बक्षीस जाहीर केले.सासू देवताळीसंशयिताची सासू देवताळी असल्याने संशयित केसरे याने मृतदेहावर गुलाल, हळद, कुंकू टाकून सासू व पत्नी यांनीच हा नरबळी दिल्याचा खोट्या दिखाव्याचा परिस्थितीजन्य पुरावा उभा केला होता.चुलत्याचा लळामृत मुलाला चुलता संतोष केसरे याचा लळा होता, तो अविवाहीत असून, भावाने त्याला मारल्याचे समजल्यावर तो त्याच्या अंगावर धावून गेला, मला मारलं पाहिजे होतस, त्या पोराला का मारलसं? असे म्हणून त्याने टाहो फोडला.