शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

दारूच्या नशेत बापाला मारायला घेतलेला चाकू मुलाच्याच पोटात गेला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 15:14 IST

Son Death when try to kill his father: बालाजी पेठेत मद्याच्या नशेत घडली घटना, मुलगा सौरभ याला दारूचे व्यसन होते, दररोज दारू पिऊन घरात वाद घालत होता.

ठळक मुद्देसुभाष वर्मा हे सोने, चांदीचे व्यापारी असून शनी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालाजी पेठेत ते कुटुंबासह वास्तव्याला आहेत

जळगाव : मद्यप्राशन केल्यामुळे खडसावल्याचा राग आल्याने मुलाने घरातील चाकू घेऊन बापावरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यात बचाव करताना हिसकावलेला चाकू मुलाच्याच पोटात घुसल्याने त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजता बालाजी पेठेत घडली. सौरभ सुभाष वर्मा (२६) असे मृत झालेल्या मुलाचे नाव असून वडील संतोष बन्सीलाल वर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.शहरातील रामपेठेतील बालाजी मंदीर परिसरात  दारूड्या मुलासोबत झालेल्या भांडणात बापाकडून चाकूने भोसकून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. बापाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून शनीपेठ पोलीसात नोंद करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  सुभाष वर्मा हे सोने, चांदीचे व्यापारी असून शनी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालाजी पेठेत ते कुटुंबासह वास्तव्याला आहेत. मुलगा सौरभ याला दारूचे व्यसन होते, दररोज दारू पिऊन घरात वाद घालत होता. शुक्रवारी रात्री १० वाजता सौरभ दारू पिऊन घरी आला. वडील संतोष बन्सीलाल वर्मा यांनी त्याला खडसावले, त्याचा त्याला राग आला. त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात सौरभने घरातील चाकू आणून वडिलांना धमकावले. दारुच्या नशेत काही याच्याकडून चाकू कोणालाही लागू शकतो, यामुळे वडिलांनी त्याच्या हातातील चाकू हिसकावला असता सौरभ हा वडिलांच्या अंगावर जोरात धावून आला व त्याचवेळी वडिलांच्या हातातील चाकू सरळ सौरभच्या पोटात भोसकला गेला. त्यात तो गंभीर जखमी झाला. तातडीने जखमी सौरभला खासगी रुग्णालय व त्यांनरत जिल्हा रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जाधव यांनी रात्री ११ वाजता मयत घोषीत केले.

घटनेची वाच्यता झाली अन‌् वडिलांना घेतले ताब्यातया घटनेची वाच्यता झाल्यानंतर शनी पेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक विठ्ठल ससे, उपनिरीक्षक सुरेश सपकाळे, कावडे, दिनेशसिंग पाटील, सलीम पिंजारी, रवींद्र पाटील, संजय शेलार, अभिजित सैदाणे, अमित बाविस्कर, राहूल घेटे, राहूल पाटील, विजय निकम व अनिल कांबळे यांच्या पथकाने घटनास्थळ व जिल्हा रुग्णालयात जावून घटनाक्रम जाणून घेत सौरभचे वडील सुभाष वर्मा यांना ताब्यात घेतले. दरम्यान, शनिवारी सकाळी  शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस