शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

लग्नास नकार दिल्याने तरुणीचे अपहरण करुन चाकू हल्ला : हडपसरमधील मगरपट्टा येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 11:36 IST

७ ते ८ वर्षांपासूनचे प्रेमसंबंध तुटल्यानंतर लग्नास नकार दिल्याने एका तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर चाकूने सपासप वार करुन

पुणे : प्रेमसंबंध तुटल्यानंतर लग्नास नकार दिल्याने एका तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर चाकूने सपासप वार करुन तिला गंभीर जखमी करण्याची घटना हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात घडली आहे़. मुंढवा पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़. प्रसाद रमेश सोनवणे, नदीम शेख (रा़ रामटेकडी) आणि चंदन चव्हांडके (रा़. कोंढवा) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत़. याप्रकरणी वडकीनाका येथे राहणाऱ्या एका २५ वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़.  हा प्रकार मुंढवा पुलापासून हडपसर मगरपट्टा सिटीदरम्यान गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजता घडला़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही तरुणी २०११ मध्ये रामटेकडी येथे राहायला असताना तिच्या घरासमोर राहणाऱ्या प्रसाद सोनवणे याच्याबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले़ गेले. ७ ते ८ वर्षे त्यांचे प्रेमसंबंध होते़. दरम्यान ही तरुणी आपल्या कुटुंबासह वडकीनाला येथे राहायला गेले़. मागील चार ते पाच महिन्यांपासून प्रसाद या तरुणीला लग्न करु म्हणून मागे लागला होता़. दारु पिऊन तो तिला मारहाणही करुन लागला़. त्यामुळे तिने त्याच्याबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकले़. तरीही तो तिला वारंवार फोन करीत़ तसेच ती कामाला असलेल्या ठिकाणी बाहेर येऊन थांबत असे़. ८ ऑगस्टला ती सायंकाळी साडेसातला कामावरुन बाहेर पडल्यावर प्रसाद दोन मित्रासह बाहेर उभा होता़. त्याने तिला जबरदस्तीने रिक्षात बसायला लावले़. रिक्षा मगरपट्टा सिटीमध्ये गेल्यावर त्याने पुन्हा तिला माझ्याबरोबर लग्न कर असा आग्रह केला़. तिने नकार देताच त्याने आपल्याकडील चाकू काढून तिच्या छातीवर, पाठीवर सपासप वार केले़. तू माझ्याशी लग्न केले नाही तर तू जिवंत असेपर्यंत मी तुला त्रास देणार, तुला ठार करणार, तुझे कोठेही लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी देऊन तिला जबरदस्तीने आपल्या घरी घेऊन गेला़. या घटनेची माहिती मिळताच या तरुणीची बहिण प्रसादच्या घरी आली़. तिने तिला हडपसर येथील साने गुरुजी रुग्णालयात दाखल केले़. मुंढवा पोलिसांनी तिघांवर अपहरण आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़.

टॅग्स :HadapsarहडपसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस