शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लोअर परळ, दादर परिसरात २४ तासात चाकू हल्ल्याच्या घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 20:46 IST

लोअर परळ आणि दादर परिसरात घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये घबराहट निर्माण झाली असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देलोअर परळ आणि दादर परिसरात घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये घबराहट निर्माण झाली हल्ल्यानंतर टॅक्सी चालक पळून गेला असून याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.ही माहिती मिळताच ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

मुंबई - शहरात गेल्या २४ तासात दोन वेगवेगळ्या घटनात दोन तरुणांना चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. लोअर परळ आणि दादर परिसरात घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये घबराहट निर्माण झाली असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग आणि शिवाजी पार्क पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. दादर येथे पाण्याचा टँकर रस्त्याच्या बाजूला लावला म्हणून राम अशोक निशाद या २१ वर्षांच्या तरुणावर टॅक्सी चालकाने चाकूने हल्ला केला. राम हा प्रभादेवी येथे राहतो. सायंकाळी साडेचार वाजता त्याने त्याच्या ताब्यातील पाण्याचा टँकर रानडे रोडवरील बबन प्रभू चौकाजवळ लावला होता. याच कारणावरुन एका टॅक्सी चालकाने त्याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्याला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. चाकू हल्ल्यात राम हा गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हल्ल्यानंतर टॅक्सी चालक पळून गेला असून याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.तर दुसरी घटना लोअर परळ परिसरात घडली. अमोल नागोजी बेलुसे हा २४ वर्षांचा तरुण अथर्व इमारतीत सहाव्या मजल्यावर राहतो. रात्री अडीच वाजता तो त्याच्या मित्रांसोबत इमारतीच्या गेटसमोरच बसला होता. यावेळी तिथे तीन तरुण आले आणि त्यांनी जुन्या वादातून मित्रांना जिवे मारण्याची धमकी देत अमोलवर चाकूने वार केले होते. या हल्ल्यात त्याच्या दंडाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही माहिती मिळताच ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी तिन्ही आरोपी तरुणांविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला आहे. तिन्ही आरोपी अमोलच्या ओळखीतले असून त्यांच्यात पूर्वीचा वाद होता. याच वादातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिस