तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 22:54 IST2019-06-04T22:54:09+5:302019-06-04T22:54:14+5:30

नालासोपारा पूर्वेकडील धानिवबाग तलावाजवळील गावदेवी मंदिराजवळ नीरज समरदेव यादव (२३) हा परिवारासोबत राहत असून तो ड्राईव्हरचे काम करतो.

Knife assault | तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला

तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला

नालासोपारा : पूर्वेकडील धानिवबाग परिसरातील २३ वर्षीय तरु णावर शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. जखमी तरुणाला व त्याला वाचिवण्यासाठी मध्यस्थी आलेल्या तरुणाला तिन्ही अनोळखी आरोपीनी मारहाण करून फरार झाले आहे. जखमी तरु णाच्या जबानीवरून वालीव पोलिसांनी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे.

नालासोपारा पूर्वेकडील धानिवबाग तलावाजवळील गावदेवी मंदिराजवळ नीरज समरदेव यादव (२३) हा परिवारासोबत राहत असून तो ड्राईव्हरचे काम करतो. १ जूनला रात्री साडे नऊच्या सुमारास घराच्या बाहेर मित्रासोबत बोलत उभा होता. त्याचवेळी दारूच्या नशेतील सचिन नावाचा तरु ण आला आणि कोणत्या तरी कारणावरून हुज्जत घालत होता. निरजच्या बिहणीने सचिनला तिकडून जाण्यास सांगितले. सचिनने नंतर दोन मित्रांसोबत निरजच्या घराजवळ फायटर आणि चाकू घेऊन येत निरजवर चाकूने हल्ला चढविला. त्याला वाचिवण्यासाठी गेलेल्या मित्रालाही या तिघांनी मारहाण केली आहे. नीरज आणि त्याच्या मित्राला उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये भर्ती केले आहे. वालीव पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न असा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Knife assault