शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

किशोर खत्री हत्याकांड: रणजितसिंह चुंगडे, पोलीस कर्मचारी जसवंतसिंह चौहान यांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 12:27 IST

अकोला: शहरातील इस्टेट ब्रोकर किशोर खत्री यांची आर्थिक वादातून निर्घृण हत्या करणाऱ्या चौघांपैकी माजी नगरसेवक रणजितसिंह चुंगडे व पोलीस कर्मचारी जसवंतसिंह चौहान ऊर्फ जस्सी यांना दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोक जाधव यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देरणजितसिंह चुंगडे, पोलीस कर्मचारी जसवंतसिंह चौहान ऊर्फ जस्सी, रूपेशसिंह चंदेल आणि राजू मेहरे यांनी किशोर खत्री यांच्यावर गोळी झाडून व धारदार कत्त्याने वार करून निर्घृण हत्या केली होती. रणजितसिंह चुंगडे आणि पोलीस कर्मचारी जसवंतसिंह चौहान यांच्याविरुद्ध सबळ पुरावे असल्यामुळे त्यांनीच किशोर खत्री यांची हत्या केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले.रूपेशसिंह चंदेल, राजू मेहरे यांच्याविरुद्ध सबळ पुरावे नसल्यामुळे न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.

अकोला: शहरातील इस्टेट ब्रोकर किशोर खत्री यांची आर्थिक वादातून निर्घृण हत्या करणाऱ्या चौघांपैकी माजी नगरसेवक रणजितसिंह चुंगडे व पोलीस कर्मचारी जसवंतसिंह चौहान ऊर्फ जस्सी यांना दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोक जाधव यांच्या न्यायालयानेजन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर त्यांचे दोन साथीदार रूपेशसिंह चंदेल, राजू मेहरे यांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. अशी माहिती प्रसिद्ध विशेष सरकारी विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी गुरुवारी सायंकाळी विश्रामगृहावर दिली.किशोर खत्री व रणजितसिंह चुंगडे यांच्या बालाजी मॉलसह इतर आर्थिक कारणांवरून वाद झाले. घटनेच्या दिवशी ३ नोव्हेंबर २०१५ रोजी दोघेही मॉलमध्ये होते. येथूनच आरोपी रणजितसिंह चुंगडे याने किशोर खत्री यांना कारमध्ये बसवून सोमठाणा शेतशिवारात नेले. या ठिकाणी रणजितसिंह चुंगडे, पोलीस कर्मचारी जसवंतसिंह चौहान ऊर्फ जस्सी, रूपेशसिंह चंदेल आणि राजू मेहरे यांनी किशोर खत्री यांच्यावर गोळी झाडून व धारदार कत्त्याने वार करून निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवसांनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाने हत्याकांडाशी संबंधित एकूण २१ साक्षीदार तपासले. रणजितसिंह चुंगडे आणि पोलीस कर्मचारी जसवंतसिंह चौहान यांच्याविरुद्ध सबळ पुरावे असल्यामुळे त्यांनीच किशोर खत्री यांची हत्या केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले; परंतु रूपेशसिंह चंदेल, राजू मेहरे यांच्याविरुद्ध सबळ पुरावे नसल्यामुळे न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. चुंगडे व जस्सी यांना न्यायालयाने भादंवि कलम ३0२(३४) व १२0 ब मध्ये जन्मठेप आणि प्रत्येकी २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी ४0 हजार रुपये मृतक किशोर खत्री यांची पत्नी शोभा खत्री यांना आणि उर्वरित १0 हजार रुपये शासन जमा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला, अशी माहितीही विशेष सरकारी विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिली. यावेळी जिल्हा सरकारी विधिज्ञ गिरीश देशपांडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

न्यायालयाला पोलीस छावणीचे स्वरूपबहुचर्चित हत्याकांडाचा निकाल आणि रणजितसिंह चुंगडे याची गुन्हेगारी पृष्ठभूमी पाहता, गुरुवारी न्यायालयाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट सशस्त्र पोलीस बंदोबस्त न्यायालय परिसरात तैनात केला होता.निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात गर्दीकिशोर खत्री हत्याकांडाचा अंतिम निकाल ऐकण्यासाठी दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोक जाधव यांच्या न्यायालयात विधिज्ञ, नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सरकारी पक्षाची बाजू प्रसिद्ध विशेष सरकारी विधिज्ञ उज्ज्वल निकम, जिल्हा सरकारी विधिज्ञ गिरीश देशपांडे यांनी मांडली. न्यायालयाच्या परिसरातसुद्धा नागरिकांसह खत्री यांचे कुटुंबीय, रणजितसिंह चुंगडे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निकालाविषयी प्रत्येकाला उत्सुकता होती.खत्री कुटुंबातर्फे निकम यांचा सत्कारअ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी केलेल्या युक्तिवादामुळे आरोपींना जन्मठेपेची शिक्षा मिळाली. त्यामुळे खत्री कुटुंबाच्यावतीने अ‍ॅड. निकम यांचा शासकीय विश्रामगृहावर सत्कार करण्यात आला. यावेळी निकम यांना दिलीप खत्री यांनी पेढे भरविले.

 

टॅग्स :AkolaअकोलाLife Imprisonmentजन्मठेपCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय