शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

पाणी भरलेल्या बादलीत बुडवून वृद्धेची हत्या; मोलकरणीसह तिघे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 05:49 IST

मोलकरणीसह तिघांना ठोकल्या बेड्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: पाणी भरलेल्या बादलीत तोंड बुडवून मारी सिलिन विल्फ्रेड डीकोस्टा (६९) या महिलेची हत्या करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार मालाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असून घरात केअर टेकर कम मोलकरणीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हत्या प्रकरणी मालाड पोलिसांनी शबनम परवीन शेख, तिचा मुलगा शहजाद आणि त्यांचा साथीदार मोहम्मद उमेर शेख (७१) या तिघांना अटक केली आहे. मायलेकाकडे कसून चौकशी करत तांत्रिक तपासाच्या माध्यमातून  मोहम्मदच्या मुसक्या त्यांनी वसई विरार परिसरातून आवळल्या. तिन्ही आरोपींना २६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे मालाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र अडाणे यांनी सांगितले.

मालाड पश्चिमच्या न्यू लाईफ सीएचएसमध्ये डीकोस्टा या राहत होत्या. त्यांचा नातू नील रायबोले (२६) हा त्याच्या वडिलांशी पटत नसल्याने डीकोस्टा यांच्यासोबतच राहायचा. जो बीकेसीमध्ये ड्रीम इलेव्हन या कंपनीत कामावर आहे. डीकोस्टा या खासगी कंपनीतून निवृत्त झाल्या. त्या भाजी आणायला किंवा चर्चमध्ये जाण्यासाठी बाहेर पडायच्या. घरकामासाठी शबनम परविन शेख हिला १९९६-९७ मध्ये  डीकोस्टा यांचे पती विल्फ्रेड त्यांनी नोकरीवर ठेवले. रायबोलेला २०१९ मध्ये बंगळुरू येथे काम मिळाल्याने डीकोस्टाची काळजी घेण्यासाठी कायमस्वरूपी मोलकरीण म्हणून शेख हिला ठेवण्यात आले. ती दोन वेळेस जेवण बनवणे, घराची साफसफाई करणे, कपडे धुणे, डीकोस्टांना मसाज करणे अशी कामे करायची. २०२० मध्ये ती गोव्याला गेली आणि २०२२ मध्ये पुन्हा कामावर आली. पतीने सोडल्यावर एका पायाने अपंग असलेली शेख भाडे तत्त्वावर मुलांसोबत राहत होती.

 डीकोस्टा फोन  उचलत नव्हत्या... रायबोले याचे लर्निंग लायसन्स बनविण्यासाठी सुरेश नामक एजंटने त्याला फोन केला आणि लायसन्स ऑथेंटिकेशनसाठी मोबाईलवर आलेला ओटीपी मागितला. तो नंबर डीकोस्टा यांच्याकडून घ्यायला सांगितल्यावर का फोन उचलत नसल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे रायबोले याने स्वतः आजीला फोन केला. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. तेव्हा तिच्या मेरी नामक मैत्रिणीला फोन करत, घरी जाण्यास सांगितले. मेरी यांनी घरात जाऊन पाहिल्यावर बाथरूममधील बादलीत तोंड बुडून बेशुद्ध अवस्थेत डीकोस्टा त्यांना दिसल्या आणि शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल केले.

सीसीटीव्हीमुळे प्रकार उघडकीसडिकोस्टा यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, त्यांचा मृतदेह शताब्दी रुग्णालयात पाठवला. तर रायबोले यांनी राहत्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सीसीटीव्ही फुटेज पाहिले. ज्यात शेख व शहजाद बाहेर पडले आणि त्याचवेळी मास्क लावलेला व पाठीवर सॅक असलेला अनोळखी इसम त्यांच्या घरात शिरला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई