शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

झोपेतच काढला काटा; जुन्या वादातून युवकाचा खून करणाऱ्या मारेकऱ्यास तासाभरात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 14:06 IST

Murder Case : घटनेनंतर पसार झालेल्या अक्षयला शोधण्यात पोलिसांनी थोडीही कसर सोडली नाही.

ठळक मुद्देप्रवीण उर्फ पुरुषोत्तम भाऊराव गायकवाड (३०) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, मारेकरी अक्षय रमेश गोटफोडे याला अवघ्या एक तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

बाभूळगाव (यवतमाळ) : जुन्या वादातून लोखंडी पाईपने हल्ला करून युवकाचा झोपेतच खून करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास येथील नेहरूनगरात घडली. प्रवीण उर्फ पुरुषोत्तम भाऊराव गायकवाड (३०) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, मारेकरी अक्षय रमेश गोटफोडे याला अवघ्या एक तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.जुन्या वादातून प्रवीण हा अक्षयला दारूच्या नशेत नेहमी शिवीगाळ करत होता. याचा वचपा काढण्याची संधी अक्षय शोधत होता. सोमवारी रात्री प्रवीण हा त्याच्या घरासमोर पालथा झोपून होता. हीच संधी अक्षयने साधली. प्रवीणच्या डोक्यात लोखंडी पाईपने हल्ला केला. यातच प्रवीण जागीच गतप्राण झाला.

घटनेनंतर पसार झालेल्या अक्षयला शोधण्यात पोलिसांनी थोडीही कसर सोडली नाही. आजूबाजूच्या परिसरात तातडीने शोध सुरू करण्यात आला. हे कार्य सुरू असतानाच सावंगी मांग (ता.बाभूळगाव) येथे अक्षय गोटफोडे याला पकडण्यात पोलिसांना यश आले. त्याच्याजवळून हल्ल्यात वापरलेले साहित्य जप्त केले. ही कारवाई ठाणेदार दिलीप वडगावकर, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, जमादार अशोक गायकी, हरीभाऊ ठाकरे, सचिन हुमने, प्रशांत पवार यांनी पार पाडली. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनी घटनास्थळाला भेट दिली.

  

टॅग्स :Deathमृत्यूYavatmalयवतमाळPoliceपोलिसArrestअटक