शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरुन पोलिसाचे अपहरण करुन जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 16:20 IST

नंबर प्लेट नसलेल्या कारला अडवून ती अभिरुची पोलीस चौकीस घेण्यास सांगितले असता तिघा तरुणांनी पोलिसांचे अपहरण करुन त्यांना मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली़..

ठळक मुद्देनंबर प्लेट नसलेल्या कारमधील तिघा तरुणांकडून मारहाण

पुणे : नंबर प्लेट नसलेल्या कारला अडवून ती अभिरुची पोलीस चौकीस घेण्यास सांगितले असता तिघा तरुणांनी पोलिसांचेअपहरण करुन त्यांना मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली़. त्यानंतर त्यांना बावधन येथे सोडून ते पळून गेले़ याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी सचिन रानवडे, मयुर मते आणि त्यांचा एक साथीदार अशा तिघांवर गुन्हा दाखल केला आहे़.ही घटना रविवारी रात्री पावणेनऊ वाजता सिंहगड रोडवरील सुमा हॉटेल ते बावधन दरम्यान घडला़. याप्रकरणी पोलीस नाईक सचिन तनपुरे यांनी फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सचिन तनपुरे हे सहकाऱ्यांसह अभिरुची पोलीस चौकीत मार्शल म्हणून कार्यरत होते़. तेव्हा हॉटेल सुमाजवळ सचिन रानवडे हा त्यांचे मित्रासह रस्त्यावर दारू पिताना मिळून आला़. त्याच्या गाडीस पाठीमागे नंबर प्लेट नव्हती़. तेव्हा त्यांनी रस्त्यावर दारु का पिता असे विचारल्यावर रानवडे याने त्यांना शिवीगाळ करुन पोलीस नाईक शिंदे यांना धक्काबुक्की केली़. त्यानंतर त्यांनी समजावून सांगून गाडी अभिरुचीला घेण्यास सांगितले व ते गाडीत पाठीमागे बसले़. त्यांनी गाडी अभिरुची चौकीला न घेता प्रयेजा सिटीमार्गे पुणे मुंबई महामागार्ने घेऊन गाडीत तनपुरे यांना शिवीगाळ केली़. यावेळी शिंदे हे त्यांच्या गाडीचा पाठलाग करत होते़. ते पाहून रानवडे याने गाडीत हाताने मारहाण केली व पुलावरुन खाली टाकून जीवे मारण्याची धमकी दिली़. त्यांच्याकडील मोबाईल व वॉकी टॉकी काढून घेऊन मयुर मते याने सचिन रानवडे याच्या मोबाईलमध्ये शुटींग करुन व्हिडिओ तयार केला़ जीवे मारण्याची धमकी देऊन तनपुरे यांना जबरदस्तीने बावधन येथे घेऊन गेले़. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़. त्यांच्यातील एकाला ताब्यात घेतले असून दोघे जण पळून गेले़ पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड अधिक तपास करीत आहेत़. 

टॅग्स :PuneपुणेSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसKidnappingअपहरणPoliceपोलिस