शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

200 रुपये दिले नाही म्हणून डोक्यात हातोडा हाणून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 22:00 IST

आरोपीस 10 मे पर्यंत कोठडी

ठळक मुद्देकाशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत दहिसर चेकनाक्याजवळ सिंगापुर इंटरनेशनल शाळा आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून ठाणे न्यायालयाने 10 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांनी दिली.

मीरारोड - 200 रुपये खर्चाचे दिले नाही म्हणून एका माळीकाम करणाऱ्या कामगाराने सुपरवायझर झोपला असताना डोक्यात हातोडा मारून हत्या केल्याप्रकरणी आरोपीला 10 मेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत दहिसर चेकनाक्याजवळ सिंगापुर इंटरनेशनल शाळा आहे. सदर शाळेतील उद्यान आदींचे माळी काम करण्यासाठी गुजरातचा ठेकेदार नेमलेला आहे. सदर ठेकेदाराने कामासाठी ठेवलेले कर्मचारी येथेच लेबर कॅम्पमध्ये राहतात.सोमवारी सायंकाळी दाखल गुन्ह्या नुसार, सुपरवायझर  देवा उर्फ देवीलाल हरिराम कालागुमान  (25)  मूळ रा. सलवाडा, उदयपूर, राजस्थान याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे दिसून आले. त्याच्याशेजारी लक्ष्मण दिता काकण (58) सागवाडा, उदयपूर हा माळीकाम करणारा मजूर बसला होता. त्यानेच देवासोबत झालेल्या भांडणाच्या रागातून तो झोपला असताना डोक्यात हातोडा मारून खून केला.पोलिसांनी आरोपीला अटक केली असून ठाणे न्यायालयाने 10 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांनी दिली. आरोपीला 5 हजार पगार होता व दर आठवड्याला 200 रुपये खर्चाला दिले जायचे. मात्र, आरोपी आजारी असल्याने गेल्या आठवड्यात कामावर आला नव्हता म्हणून देवाने खर्चाचे 200 रुपये इतर मजुरांना दिले मात्र आरोपीला दिले नाहीत. त्यावरून राग येऊन आरोपीचे देवासोबत भांडण झाले आणि रात्री हत्या केल्याचे हजारे म्हणाले.

टॅग्स :Murderखूनmira roadमीरा रोडPoliceपोलिस