शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

चारकोपमध्ये पैशांसाठी वर्षभराच्या मुलीचे अपहरण!, दोन तासात अपहरणकर्ते गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 05:49 IST

Crime News : अवघ्या दोन तासात या अपहरणाचा गुंता सोडवत मुलीची आईशी भेट घडवून आणणाऱ्या चारकोप पोलिसांचे वरिष्ठांकडून कौतुक केले जात आहे.

मुंबई :  पैशांसाठी वर्षभराच्या मुलीचे अपहरण करून तिला विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या जोडप्यासह चौघांच्या मुसक्या चारकोप पोलिसांनी आवळल्या. अवघ्या दोन तासात या अपहरणाचा गुंता सोडवत मुलीची आईशी भेट घडवून आणणाऱ्या चारकोप पोलिसांचे वरिष्ठांकडून कौतुक केले जात आहे.सचिन येलवे (४०), सुप्रिया येलवे (३५), रश्मी रत्नाकर नायक ऊर्फ रश्मी राजू पवार (२९) आणि राजू मोहन पवार (३६) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. सुनीता गुरव या घरकाम करतात. भूमी पार्क समोरील फुटपाथवर त्या पती आणि मुलीसोबत २ नोव्हेंबर, २०२० रोजी रात्री  झोपल्या असताना त्यांच्या एक वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आले. याची तक्रार त्यांनी चारकोप पोलिसांना दिली. घटनेची गंभीरता लक्षात घेत परिमंडळ ११चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर आणि चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत ढेंबरे यांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्याच्या मदतीने अवघ्या दोन तासात त्यांनी अपहृत मुलीला शोधून काढले आणि पालकांकडे सुपूर्द केले. येलवे जोडप्याला मूलबाळ नसल्याने पवार दाम्पत्याने मुलीला २ नोव्हेंबर रोजी पळवले आणि येलवेंना दिले. मुलगी लहान असून ती बोलू शकत नसल्याने पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत असा गैरसमज अपहरणकर्त्यांना होता. मात्र पोलिसांनी वेळीच त्यांचा गाशा गुंडाळल्याने मुलीची सुखरूप सुटका करण्यात त्यांना यश मिळाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई