शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पैशांच्या देवाण घेवाणच्या वादातून शिपींग एजंटचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 16:02 IST

Kidnap Case :अन्य एका शिपींग एजंटसह दोघांना अटक

डोंबिवली:  पैशांच्या देवाण-घेवाण वरून झालेल्या वादात एका शिपींग एजंटने दोघांच्या सहाय्याने 65 वर्षीय शिपींग एजंटचे अपहरण केल्याची घटना 1 जानेवारीला घडली होती. दरम्यान या गुन्हयातील आरोपींना अटक करण्यात मानपाडा पोलिसांना यश आले आहे. अपहत शिपींग एजंटची नालासोपारा येथील गोराई नाक्याजवळील एका हॉटेलमधून सुखरूप सुटका करण्यात आली.

डोंबिवली पुर्वेतील स्टार कॉलनी परिसरात राहणारे शुभाशिष बॅनजी (वय 65) हे शिपींग एजंट आहेत. त्यांना मनजीत यादव (वय 25)नावाच्या शिपींग एजंटने तीन तरु णाना शिपिंगमध्ये कामाला लावण्यासाठी तीन लाख रु पये दिले होते. बॅनर्जी याने तरु णांसाठी काम शोधले. त्यांचा व्हीसा तयार केला. यासाठी मनजीत याने दिलेले पैसे खर्च झाले. त्या तीन तरु णांची श्रीलंकेस जाण्याकरीता तारीख देखील निश्चीत झाली. मात्र तिघांची कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आल्याने तिघांना क्वारंटाईन करण्यात आले. 15 दिवस क्वारंटाईन असल्याने व्हिसाची मुदत संपली. यावर मनजीतकडून शुभाशिष यांना दिलेल्या पैसे माग्ण्यास सुरु वात केली. बॅनर्जी यांनी सर्व पैसे खर्च झाले असे त्याला सांगितले परंतू मनजीतने पैशांचा तगादा सुरूच ठेवला.

पैसे मिळत नसल्याने मनजीतने धनंजय यादव आणि  सोमप्रकाश यादव यांच्या मदतीने  बॅनर्जी यांचे अपहरण केले. अपहरणाची माहिती कळताच बॅनजी यांच्या पत्नीने मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्र ार दिली. अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त जे. डी. मोरे आणि  वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक  सुनिल तारमळे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु  केला.  मनजीत हा बॅनर्जी यांच्या पत्नीला वारंवार फोन करु न पाच लाख रु पयांची मागणी करीत होता. पैसे दिले नाही तर जीवे ठार मारुन टाकण्याची धमकीही देत होता. इतकेच नाही तर अकाऊंटमध्ये पैसे टाकण्यास सांगितले. पोलिसांकडे ज्या अकाऊंटमध्ये पैसे जमा झाले त्याची माहिती होती. तसेच मोबाईल लोकेशन द्वारे तपास सुरु  झाला. नाला सोपारा येथील गोराई नाकाजवळील एका हॉटेलमधून बॅनर्जी यांची सुटका केली. पोलिसांनी मनजीतसह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. तिघे आरोपी उत्तर प्रदेशात राहणारे आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसKidnappingअपहरणArrestअटकdombivaliडोंबिवली