शहरं
Join us  
Trending Stories
1
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
2
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
3
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
4
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
5
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
6
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
7
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
8
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
9
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
10
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
11
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
12
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
13
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
14
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
15
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
16
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
17
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
18
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
19
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
20
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा

गृहमंत्र्यांच्या मुलीचे अपहरण, अवघा देश हादरलेला; रुबियांनी यासिन मलिकला ओळखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 19:56 IST

Rubaiya Sayeed Kidnapping Case: 8 डिसेंबर १९८९ या दिवशी, केंद्रात तेव्हा व्ही पी सिंह यांचे सरकार होते. सत्तेत येऊन एकच आठवडा झाला होता. सायंकाळी देशाच्या गृहमंत्र्यांच्या मुलीचे अपहरण केल्याचे वृत्त धडकले आणि धावपळ उडाली.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मुलीने शुक्रवारी विशेष सीबीआय न्यायालयासमोर जेकेएलएफचा प्रमुख यासीन मलिक आणि अन्य तिघांची ओळख पटविली. 1989 रूबिया सईद हिचे अपहरण करण्यात आले होते. तिच्या बदल्यात पाच खतरनाक दहशतवाद्यांना सोडण्याची मागणी करण्यात आली होती. 

पहिल्यांदाच रूबिया सईदला न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते. सीबीआय वकील मोनिका कोहली यांनी सांगितले की, रूबिया सईद ज्या पीडीपी प्रमुख महबुबा मुफ्ती यांची बहीण आहेत, तिचा जबाब नोंदविण्यात आला. या वेळी तिने मलिकला ओळखले. या प्रकरणी २३ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. रूबियाने एकूण चार आरोपींची ओळख पटविली आहे. रूबिया या सध्या तामिळनाडूमध्ये राहतात. सीबीआयकडून त्यांना साक्षीदार म्हणून नोंद करण्यात आली आहे. १९९० च्या सुरुवातीला सीबीआयने या अपहरण प्रकरणाची चौकशी हाती घेतली होती. बंदी घातलेल्या जेकेएलएफचा प्रमुख यासिन मलिक या प्रकरणी मुख्य आरोपी आहे. त्याला एका दहशतवादी फंडिंग प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. 

काय आहे प्रकरण?8 डिसेंबर १९८९ या दिवशी, केंद्रात तेव्हा व्ही पी सिंह यांचे सरकार होते. सत्तेत येऊन एकच आठवडा झाला होता. दुपारी  ३ वाजता मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रूबिया सईद ही श्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करत होती. ड्यूटी संपवून घरी निघाली असता तिची बस आधीच प्रवासी म्हणून उपस्थित असलेल्या तीन दहशतवाद्यांनी थांबविली. रुबियाला खाली उतरवून निळ्या रंगाच्या मारुतीमध्ये बसविले आणि अपहरण केले. भारताच्या गृहमंत्र्यांच्या मुलीचे अपहरण झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. दोन तासांनी जेकेएलएफच्या जावेद मीरने स्थानिक वृत्तपत्राला फोन करून याची जबाबदारी स्वीकारली. 

दिल्ली ते श्रीनगर पोलीस ते इंटेलिजन्समध्ये मोठी खळबळ उडाली. दहशतवाद्यांनी रुबियाच्या बदल्यात ७ दहशतवाद्यांना सोडण्याची मागणी केली. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न झाला. यात पाच दिवस गेले. दिल्लीतून दोन मंत्री श्रीनगरला आले, मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना भेटले. 

१३ डिसेंबरच्या दुपारी दहशतवाद्यांमध्ये ५ दहशतवाद्यांना सोडण्यावर समझोता झाला. सायंकाळी पाच वाजता पाच दहशतवादी सोडण्यात आले. यानंतर काही तासांत रुबियाला देखील सोडण्यात आले. रुबियाला रातोरात दिल्लीला नेण्यात आले. तिथे गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद आणि महबूबा मुफ्ती विमानतळावर आल्या होत्या. सईद यांनी एक बाप म्हणून मी खूश असलो तरी नेता म्हणून नाही, असे व्हायला नको होते, असे ते म्हणाले होते. 

टॅग्स :Mehbooba Muftiमेहबूबा मुफ्ती