शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

अल्पवयीन भावंडांचे अपहरण करत बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 19:32 IST

१० लाखांची मागितली होती खंडणी, नायगांव पोलिसांनी केली सुखरूप सुटका

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे): नायगांवमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय मुलगी आणि ७ वर्षाचा मुलगा असे अल्पवयीन भावंडांचे आरोपीने अपहरण करत बॉम्बने उडवून देण्याची धमकी देत १० लाखांची खंडणी मगितल्याची घटना उघडकीस आली आहे. नायगांव पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन भावंडांची सुखरूप सुटका करून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले - श्रींगी यांनी सोमवारी दिली आहे.

२३ डिसेंबरला नायगाव येथे राहणारे दीपककुमार यांना दोन्ही मुलांचे अपहरण केले असून त्यांच्या पोटावर बॉम्ब बांधून ठेवला असून त्याचा रिमोट माझ्या हातात असून एका मिनिटांत मारू शकतो. ते सुखरूप पाहिजे असतील तर १० लाख रुपये सांगितलेल्या जागेवर घेऊन दोन्ही मुलांना घेऊन जा असे बोलून आरोपींनी मुलांचा आवाज ऐकविला. घाबरलेल्या वडिलांनी नायगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देत अपहरणाचा गुन्हा दाखल केला. सदर प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठांनी तात्काळ तीन शोध पथके तयार केले. तिन्ही पथकांना अपहत बालकांचा शेध घेण्यासाठी तात्काळ रवाना केले. तांत्रिक तपास व गोपनीय खबऱ्याचे आधारे अपहत बालकांचा शोध घेत असतांना बालकांना मिनाक्षी नगर, काशिगांव येथील एका खोलीत डांबुन ठेवल्याचे निष्पन्न झाले. अपहरणकर्त स्वतःच्या ठावठिकाणा लपवून मुलांच्या वडिलांकडे १० लाख रुपयांच्या खंडणीची रक्कम मागत होते. सदर आरोपी खंडणीची रक्कम मागण्यासाठी अपहरणकर्ते विविध मोबाईल क्रमांकांचा वापर करत होते.

अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी नायगांव पोलीसांनी वेशभुषा बदलुन वसईच्या मधूबन येथे ठिकठिकाणी सापळा लावून अपहरणकर्त्यांचा शोध घतला. दोन्ही आरोपींना ताब्यात घेत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी शिताफीने त्यांना ताब्यात घेऊन अटक केले. आरोपींना ताब्यात घेत असतांना अपकरणकर्ते तसेच पोलीस अंमलदार अशोक पाटोल हे किरकोळ जखमी झाले. मिरा रोड येथे राहणारे आरोपी जयप्रकाश उर्फ सोनू गुप्ता (२३) आणि विपुल तिवारी (२०) यांनी कट रचून अल्पवयीन भावंडांचे अपहरण केले होते. त्या दोघांची पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे.दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर २९ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी सांगितले.

पोलीस उपायुक्तांसमवेत इतर सहकाऱ्यांच्या साथीने ही कारवाई यशस्वी करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी