शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाच्या वसुलीसाठी मुलाचे अपहरण, पाच लाखांसाठी उकळले २९ लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 05:59 IST

महावितरणचे इलेक्ट्रिक ठेकेदार असलेले विठ्ठल पाटील यांनी अशोक पाटील यांच्याकडून गरजेपोटी पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.

कोल्हापूर : थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कर्जदाराच्या मुलाचे अपहरण करून कर्जदाराला धमकावणाऱ्या खासगी सावकारांवर कळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अशोक राजाराम पाटील, त्याचा मुलगा अवधूत (दोघेही रा. कळे, ता. पन्हाळा), प्रल्हाद संपतराव भोसले, प्रदीप मधुकर भोसले, सरपंच मानसिंग विलास भोसले (तिघेही रा. आसगाव, ता. पन्हाळा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत विठ्ठल आनंदा पाटील (४४, रा. आकुर्डे, ता. पन्हाळा) यांनी शनिवारी फिर्याद दिली.

महावितरणचे इलेक्ट्रिक ठेकेदार असलेले विठ्ठल पाटील यांनी अशोक पाटील यांच्याकडून गरजेपोटी पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या बदल्यात अशोक पाटील व त्यांचा भागीदार प्रदीप भोसले यांच्याकडे विठ्ठल पाटील यांनी दरमहा वीस टक्के व्याजदराने २९ लाख रुपये परत केले. अशोक पाटील, त्याचा मुलगा अवधूत व प्रल्हाद भोसले यांनी आणखी पैशांसाठी तगादा लावला होता. 

धमकावून २७ लाख परत घेतलेयाबाबत फिर्यादींनी पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिली होती. यावेळी कारवाई टाळण्यासाठी संशयित आरोपी अशोक पाटील व अवधूत पाटील यांनी सत्तावीस लाख रुपये विठ्ठल पाटील यांच्या खात्यावर पाठवले. त्यानंतर लगेच विठ्ठल पाटील यांचा मुलगा पीयूष याला अशोक पाटील व अवधूत पाटील यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर धमकावून २७ लाख रुपये परत घेतले. या घटनेनंतर विठ्ठल पाटील यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबीयांसह उपोषण केले होते. त्यानंतर शाहूवाडी उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब पोवार यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारी