बिहारमधून अपहरण केले, यूपी, राजस्थानमध्ये विकले, तीन वर्षांनंतर बहिणीला भावाने शोधून काढले

By बाळकृष्ण परब | Published: February 19, 2021 11:47 AM2021-02-19T11:47:11+5:302021-02-19T11:47:43+5:30

Crime News : महिलांवर होणारे अत्याचार ही आपल्या देशातील मोठी समस्या आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या वेगवेगळ्या बातम्या दररोज येत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Kidnapped from Bihar, sold in UP, Rajasthan, sister found by brother three years later | बिहारमधून अपहरण केले, यूपी, राजस्थानमध्ये विकले, तीन वर्षांनंतर बहिणीला भावाने शोधून काढले

बिहारमधून अपहरण केले, यूपी, राजस्थानमध्ये विकले, तीन वर्षांनंतर बहिणीला भावाने शोधून काढले

Next

नवी दिल्ली - महिलांवर होणारे अत्याचार ही आपल्या देशातील मोठी समस्या आहे. (Crime News) महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या वेगवेगळ्या बातम्या दररोज येत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीचे ती अल्पवयीन असताना अपहरण झाले. त्यानंतर तिच्याच चारित्र्यावर संशय घेत पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना सहकार्य करणे टाळले. (Brother-Sister) दरम्यानच्या तीन वर्षांच्या काळात तिची विक्री झाली. अखेर तीन वर्षांच्या शोधानंतर ती सापडली तेव्हा ती कुमारीका माता बनली होती. जेव्हा तिची भावासोबत भेट झाली तेव्हा बहीण भावाचे अश्रू अनावर झाले. (Kidnapped from Bihar, sold in UP, Rajasthan, sister found by brother three years later)

मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणीचे बिहारमधील जहानाबाद येथून ती अल्पवयीन असताना २०१८ मध्ये अपहरण झाले होते. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत आरोपींची नावेही सांगिलती होती. आरोपींच्या गँगमध्ये एक महिलाही होती. ही गँग महिलांचे अपहरण करून त्यांची विक्री करत असे. या गँगमधील महिलेनेच या तरुणीचे अपहरण करून तिला उत्तर प्रदेशमधील नोएडा आणि राजस्थानमधील दौसापर्यंत पाठवले. 

मात्र या प्रकरणाच्या तपासामध्ये बिहार पोलिसांनी सहकार्य केले नसल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला. उलट तुमची मुलगी प्रेमात पडून पळून गेली, असे सांगून तिच्या कुटुंबीयांना टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र कुटुंबाने आपल्या मुलीचा शोध घेण्याचे प्रयत्न थांबवले नाहीत. त्यांनी आपल्या पातळीवर कॉल डिटेल आणि मोबाइलचे लोकेशन ट्रेस करत प्रयत्न सुरू ठेवले. 

दरम्यान, आपली बहीण राजस्थानमधील दौसा येथे असल्याचे समजल्यावर तिचा भाऊ पोलीस ठाण्यात गेला. त्यानंतर पोलिसांना घेऊन ते दौसा येथे पोहोचले. त्यानंतर दौसामधील सदर पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या मदतीने गांगल्यावास गावात जात पीडित तरुणीला ताब्यात घेतले. आपल्या बहिणीची अवस्था पाहून भावाचे अश्रू अनावर झाले. या तरुणीचा विवाह झाला नाही. मात्र तिला दोन मुले झाली. या तीन वर्षांच्या काळात तिची अनेक ठिकाणी विक्री झाली. 

आता महिलेचा शोध लागल्यानंतर पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच या महिलेची कुठे कुठे विक्री करण्यात आली. तसेच तिचे खरेदीदार कोण कोण होते याचा शोध घेतला जात आहे. 

Web Title: Kidnapped from Bihar, sold in UP, Rajasthan, sister found by brother three years later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.