शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

खेरवाडी पोलिस ठाण्याला आग, कर्मचारी मृत्युमुखी, आगीचे कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 08:02 IST

पोलिस ठाण्याच्या स्टोअर रूमला आग लागल्यावर अरविंद खोत दरवाजा उघडून बाहेर का आले नाहीत, स्टोअर रूममध्येच का राहिले, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वांद्रे येथील खेरवाडी पोलिस ठाण्यात जप्त साहित्य ठेवलेल्या स्टोअर रूमला सोमवारी दुपारी आग लागली. या आगीत सहायक पोलिस उपनिरीक्षक अरविंद खोत (५७) यांचा भाजून मृत्यू झाला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैधरीत्या उभारण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर पोलिस कारवाई करतात. अशाच एका गाडीवर कारवाई करण्यात आल्यानंतर जप्त केलेल्या वस्तू खेरवाडी पोलिस ठाण्याच्या एका स्टोअर रूममध्ये  ठेवण्यात आल्या होत्या. दुपारच्या सुमारास स्टोअर रूमला अचानक आग लागली. त्यात खोत ९५ टक्के भाजले. त्यांना आधी सायन रुग्णालयात व नंतर भायखळ्यातील मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अखेरीस त्यांचा मृत्यू झाला. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, आम्ही तपास करत आहोत, असे परिमंडळ आठचे पोलिस आयुक्त दीक्षित गेडाम यांनी सांगितले.

संशयाचा धूर...पोलिस ठाण्याच्या स्टोअर रूमला आग लागल्यावर अरविंद खोत दरवाजा उघडून बाहेर का आले नाहीत, स्टोअर रूममध्येच का राहिले, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. खोत स्टोअर रूममध्ये एकटेच होते. त्यामुळे किरकोळ आग लागली, तेव्हा खोत बाहेर येऊन आपल्या अन्य सहकाऱ्यांना कळवू शकले असते. मात्र, आग लागल्यावरही स्टोअर रूमचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा तोडून खोत यांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे स्टोअर रूममध्ये काहीतरी गडबड झाल्याचा आम्हाला संशय असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेfireआग