शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

खार हत्याप्रकरण : जान्हवी कुकरेजाच्या आरोपपत्रात त्रुटी, आरोपी जोगधनकरच्या वकिलांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 03:39 IST

जान्हवी कुकरेजा (वय १९) या विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी खार पोलिसांनी अडीचशे पानी आरोपपत्र मंगळवारी (दि. ३०) कोर्टात दाखल केले. मात्र यात बऱ्याच त्रुटी असल्याचा दावा आरोपी असलेल्या श्री जाेगधनकर याच्या वकिलांकडून करण्यात आला

मुंबई :  जान्हवी कुकरेजा (वय १९) या विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी खार पोलिसांनी अडीचशे पानी आरोपपत्र मंगळवारी (दि. ३०) कोर्टात दाखल केले. मात्र यात बऱ्याच त्रुटी असल्याचा दावा आरोपी असलेल्या श्री जाेगधनकर याच्या वकिलांकडून करण्यात आला असून, त्यामुळे पीडितेला खरा न्याय मिळणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.खार पोलिसांनी घटनेच्या तीन महिन्यांनंतर कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, भगवती हाईट्स इमारतीच्या १४व्या मजल्यावर २० जण पार्टी करीत होते. ज्यात सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने १२ जणांचे जबाब नोंदविण्यात आले. हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टर, न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ज्ञ यांचाही जबाब नाेंदविण्यात आला. जान्हवीच्या अंगावर ४८ जखमा आढळल्याचा उल्लेख आहे. मात्र श्री जोगधनकर याचे वकील ॲड. महेश वासवानी यांच्या म्हणण्यानुसार श्री याच्या पाठीच्या कण्याला दुखापत आहे; तसेच डोक्यालाही आठ इंचांची जखम आहे, जी एखादी बॉटल डोक्यावर फोडल्यामुळे झाल्याचा संशय आहे. ही जखम त्याला त्या दोन मुली (जान्हवी, दिया) यांनी मारहाण केल्यामुळे होऊ शकत नाही. तर, पोलिसांनी ज्या दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या, त्यानुसार दारू पिणाऱ्या सर्व जणांचे जबाब नोंदविण्यात आले नाहीत. त्यामुळे या प्रकरणात चौथ्याच व्यक्तीचा हात असून त्यानुसार सर्व वैद्यकीय अहवालही पोलिसांनी कोर्टात सादर करणे आवश्यक आहे. मात्र तसे करण्यात आलेले नाही, असेही ॲड. वासवानी यांचे म्हणणे आहे. पोलिसांची दिशाभूल होत असून, त्यानुसार त्यांनी चौकशी करावी, अशी मागणी करीत पीडितेला खरा न्याय मिळावा, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय