शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात एक क्विंटल गांजा पकडला! उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 13:59 IST

खामगावात एक क्विंटल गांजा पकडला! उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाची कारवाई खामगाव : आॅटोतून गांजाची तस्करी केल्या जात असल्याच्या गुप्त माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने राष्ट्रीय महामार्गावर सिनेस्टाईल पाठलाग केला. यामध्ये आॅटोसह सुमारे १ क्विंटल गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई राष्ट्रीय महामार्गावरील एमआयडीसी टर्निंगवर करण्यात आली. या कारवाईमुळे खामगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अकोला येथून नांदुरा येथे एका आॅटोतून गांजाची वाहतूक केल्या जात असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाला मिळाली.  या माहितीच्या आधारे एसडीपीओ पथकाने पाठलाग केला असता, तत्पूर्वीच एम एच २८ टी- ७१८ हा आॅटो घाटपुरी टर्निंग जवळून पुढे निघून गेला.  त्यामुळे एसडीपीओ पथकाने संशयीत आॅटोची माहिती एमआयडीसी टर्निंग पाँईटवर तैनात असलेल्या नापोकॉ किरण राऊत आणि पोकॉ राहुल इंगळे यांना दिली. या माहितीच्या आधारे शिवाजी नगर पोलिसांनी आॅटो थांबवून झाडाझडती घेतली. तेवढ्यात उपविभागीय पोलिस अधिकारी पथकही घटनास्थळी पोहोचले. यावेळी एक महिला आणि ४ पुरूष  आॅटोतून  गांजा घेवून जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी आॅटोसह आॅटोतून नांदूरा येथे नेल्या जाणारा गांजा जप्त केला. त्याचवेळी आॅटोसमोरून जात असलेल्या दुचाकीवरील दोघांपैकी एक जण दुचाकीसोडून पसार झाला. रस्ता साफ असल्याचा इशारा या दुचाकीवरूनच आॅटोला दिल्या जात होता.  एमएच २८ बीडी ०१२९ क्रमांकाच्या दुचाकीचा वापर गुन्ह्यासाठी करण्यात आल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाने ही दुचाकीही ताब्यात घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात एपीआय अमर चोरे, पीएसआय बोरसे, हेकॉ. सुनिल राऊत, नापोकॉ राऊत, प्रदीप मोरे, थोरात, देवेंद्र शेळके, सुधाकर थोरात, रविंद्र कन्नर, विशाल कोळी, सुनील बैनाडे, गोपाल वरूडकार यांनी ही कारवाई केली. शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सहा लाखाच्यावर असल्याचे समजते. गांजा आणि साहित्य मिळून पोलिसांनी सात लाखाचा ऐवज जप्त केल्याचा दावा सुत्रांनी केला आहे. सहा आरोपी ताब्यात; एक फरार! ताराचंद नारायण आठवले (४६), रा. सतीफैल, सुरेश लालचंद पवार (३४), लखन दुर्योधन चव्हाण (२२), अजय सुरेश पवार(१६), लालचंद परबत पवार (६०),  लीला लालचंद पवार(५५), विनोद पंडित चव्हाण(३२) सर्व रा. जळका तेली, ता. खामगाव अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी मोटार सायकलवरील विनोद पंडित चव्हाण हा आरोपी मोटार सायकल घटनास्थळी सोडून फरार झाला. तर उर्वरीत सहाही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. मोटार सायकलीवर मागे बसलेल्या लालचंद पवार यालाही पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले. चॉकलेटच्या वेस्टनात गांजाची पॅकीग! नामांकित कंपनीचे चॉकलेट पॅकींग करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या वेस्टनाचा आरोपींनी गांजा पॅक करण्यासाठी वापर केला होता. प्रत्येकी दोन ते सव्वादोन किलो गांजांचे ५० पॅकेट यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रीया सुरू आहे.

खामगाव : आॅटोतून गांजाची तस्करी केल्या जात असल्याच्या गुप्त माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने राष्ट्रीय महामार्गावर सिनेस्टाईल पाठलाग केला. यामध्ये आॅटोसह सुमारे १ क्विंटल गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई राष्ट्रीय महामार्गावरील एमआयडीसी टर्निंगवर करण्यात आली. या कारवाईमुळे खामगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.अकोला येथून नांदुरा येथे एका आॅटोतून गांजाची वाहतूक केल्या जात असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाला मिळाली.  या माहितीच्या आधारे एसडीपीओ पथकाने पाठलाग केला असता, तत्पूर्वीच एम एच २८ टी- ७१८ हा आॅटो घाटपुरी टर्निंग जवळून पुढे निघून गेला.  त्यामुळे एसडीपीओ पथकाने संशयीत आॅटोची माहिती एमआयडीसी टर्निंग पाँईटवर तैनात असलेल्या नापोकॉ किरण राऊत आणि पोकॉ राहुल इंगळे यांना दिली. या माहितीच्या आधारे शिवाजी नगर पोलिसांनी आॅटो थांबवून झाडाझडती घेतली. तेवढ्यात उपविभागीय पोलिस अधिकारी पथकही घटनास्थळी पोहोचले. यावेळी एक महिला आणि ४ पुरूष  आॅटोतून  गांजा घेवून जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी आॅटोसह आॅटोतून नांदूरा येथे नेल्या जाणारा गांजा जप्त केला. त्याचवेळी आॅटोसमोरून जात असलेल्या दुचाकीवरील दोघांपैकी एक जण दुचाकीसोडून पसार झाला. रस्ता साफ असल्याचा इशारा या दुचाकीवरूनच आॅटोला दिल्या जात होता.  एमएच २८ बीडी ०१२९ क्रमांकाच्या दुचाकीचा वापर गुन्ह्यासाठी करण्यात आल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाने ही दुचाकीही ताब्यात घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात एपीआय अमर चोरे, पीएसआय बोरसे, हेकॉ. सुनिल राऊत, नापोकॉ राऊत, प्रदीप मोरे, थोरात, देवेंद्र शेळके, सुधाकर थोरात, रविंद्र कन्नर, विशाल कोळी, सुनील बैनाडे, गोपाल वरूडकार यांनी ही कारवाई केली. शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सहा लाखाच्यावर असल्याचे समजते. गांजा आणि साहित्य मिळून पोलिसांनी सात लाखाचा ऐवज जप्त केल्याचा दावा सुत्रांनी केला आहे.

सहा आरोपी ताब्यात; एक फरार!ताराचंद नारायण आठवले (४६), रा. सतीफैल, सुरेश लालचंद पवार (३४), लखन दुर्योधन चव्हाण (२२), अजय सुरेश पवार(१६), लालचंद परबत पवार (६०),  लीला लालचंद पवार(५५), विनोद पंडित चव्हाण(३२) सर्व रा. जळका तेली, ता. खामगाव अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी मोटार सायकलवरील विनोद पंडित चव्हाण हा आरोपी मोटार सायकल घटनास्थळी सोडून फरार झाला. तर उर्वरीत सहाही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. मोटार सायकलीवर मागे बसलेल्या लालचंद पवार यालाही पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले.

चॉकलेटच्या वेस्टनात गांजाची पॅकिग!नामांकित कंपनीचे चॉकलेट पॅकींग करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या वेस्टनाचा आरोपींनी गांजा पॅक करण्यासाठी वापर केला होता. प्रत्येकी दोन ते सव्वादोन किलो गांजांचे ५० पॅकेट यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रीया सुरू आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrimeगुन्हा