शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Ketaki Chitale: जामीन अर्ज फेटाळूनही केतकी चितळेला अटक नाही; पोलिसांकडून हात आखडता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 09:46 IST

केतकी चितळेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळूनदेखील नवी मुंबई पोलिसांकडून आठ महिने तिच्या अटकेत हात आखडता घेतल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहणारी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे पोलिसांनी अटक केली असताना,  रबाळे पोलिसांनीदेखील तिचा ताबा घेण्याची मागणी होऊ लागली आहे. तिच्यावर २०२० मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र, तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळूनदेखील नवी मुंबई पोलिसांकडून आठ महिने तिच्या अटकेत हात आखडता घेतल्याचे तक्रारदार स्वप्नील जगताप यांनी रविवारी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर टीका केल्याप्रकरणी  केतकी हिला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. याच प्रकरणात तिच्यावर इतरही दोन ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. पवार यांच्यावर टीका होताच तिला तत्काळ कळंबोली येथील राहत्या घरातून अटक केली. मात्र, अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी तिच्या अटकेबाबत पोलिसांनी हात आखडता घेतल्याची खंत तक्रारदार ॲड. स्वप्नील जगताप यांनी व्यक्त केली. दरम्यान, नेरूळच्या रहिवाशी सुमित्रा पवार यांच्या तक्रारीवरून नेरुळ पोलीस ठाण्यात केतकीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूरज शिंदे फरार घोषित

२०२० मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात जगताप यांच्या तक्रारीवरून केतकी चितळेविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. केतकी व सूरज शिंदे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांबद्दल संतापजनक वक्तव्य केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तिने अटकपूर्व जामिनासाठी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज केला होता. तर सूरज शिंदे नावाच्या व्यक्तीचा शोध घेऊनही तो न सापडल्याने पोलिसांनी त्याला फरार घोषित केले आहे. 

सप्टेंबर २०२१ मध्ये फेटाळला जामीन अर्ज

न्यायालयाने सप्टेंबर २०२१ मध्ये केतकीचा अटकपूर्व अर्ज फेटाळल्याने नवी मुंबई पोलिसांकडून तिला अटक होणे अपेक्षित होते. परंतु, तत्कालीन अधिकाऱ्यांनी चालढकल करून आठ महिन्यांपासून तिची अटक टाळल्याचा आरोप तक्रारदार जगताप यांनी केला आहे. त्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या बांधवांकडून रबाले पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

टॅग्स :Ketaki Chitaleकेतकी चितळेNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस