शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

प्रेशर कुकरपासून तयार झाली हत्येची रेसिपी; गर्लफ्रेंडवर संशय होताच केला THE END

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 16:10 IST

वैष्णव आणि देवा दोघेही मार्केटिंग सेक्टरमध्ये होते, दोघे वेगवेगळ्या कंपनीत काम करत होते.

बंगळुरू – प्रेशर कुकरची सीटी सारखी वाजत राहते, एकाक्षणी ती घाबरवून टाकते. परंतु त्यादिवशी घरातील प्रेशर कुकरची सीटी वाजली नाही मात्र प्रेशर कुकर तिच्या हत्येचे कारण बनले. प्रेशर कुकरचा वापर जेवण बनवण्यासाठी केला जातो. परंतु त्यादिवशी तिच्या मृत्यूची रेसिपी तयार केली गेली. खून त्यानेच केला ज्याच्यावर मुलीने सर्वाधिक भरवसा ठेवला होता. प्रेशर कुकरने तिच्याच बेस्ट फ्रेंडला कायमचे संपवले.

ही घटना बंगळुरूची, परंतु घटनेचा संबंध केरळशी आहे. वैष्णव आणि देवा कॉलेजमध्ये एकमेकांना भेटले होते. केरळमध्ये एका कॉलेजमध्येच दोघे शिकायला होते. शिक्षण काळात त्यांची मैत्री झाली. हळूहळू नाते आणखी बहरू लागले. वेळही पुढे जात होती. दोघांना नोकरी केरळहून दूर असलेल्या बंगळुरू इथं लागली. नवीन शहर, नवीन नोकरी, परंतु वैष्णव आणि देवा एकमेकांना आधार देत होते. या दोघांची मैत्री आणखी घट्ट झाली.

वैष्णव आणि देवा दोघेही मार्केटिंग सेक्टरमध्ये होते, दोघे वेगवेगळ्या कंपनीत काम करत होते. दक्षिण बंगळुरूत दोघांनी एकच फ्लॅट घेतला आणि एकत्र राहू लागले. स्वत: जेवण बनवत, प्रेमाने एकमेकांसोबत राहत होते. लवकरच दोघे लग्न करणार होते. कुटुंबालाही दोघांच्या नात्याची कल्पना होती. २४ वर्षीय देवा तिरुवनंतपुरमला राहणारी होती. तर वैष्णवचं कुटुंब कोवलम इथे राहत होते. हे दोघेही एकत्र राहत होते हेदेखील कुटुंबाला ठाऊक होते.

लग्नाचा विचार अन् नात्यात सुरू झालं भांडण

वेळ निघून जात होता. ल्विह इन रिलेशनशिपमध्ये राहून दोघांना ३ वर्ष झाली होती. परंतु काही काळाने दोघांमध्ये वारंवार भांडण होऊ लागले. जे मित्र घरी येऊन एकमेकांसोबत आनंदाने राहायचे आता त्यांच्या वाद सुरू झाले. शेजाऱ्यांनाही त्यांच्या भांडणाची माहिती झाली, मुलीच्या ओरडण्याचा आवाज सारखा बाजूच्या फ्लॅटधारकांना ऐकायला जायचा.

वैष्णवच्या डोक्यात संशयाने घर केले होते. देवाचे अन्य कुणासोबत लफडं सुरू आहे असं त्याला वाटत होते. त्यावरूनच या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. परंतु या भांडणाने इतकं भयंकर रुप घेतले की ज्याचा कुणी अंदाजही लावला नसेल. शनिवारी दोघेही घरीच होते. किचनमध्ये प्रेशर कुकर होता ज्यात भात शिजवला जायचा. संध्याकाळी ५ ची वेळ होती. वैष्णवच्या डोक्यात संशयाचे भूत काहूर माजवत होता. त्याने रागाच्या भरात किचनमधील प्रेशर कुकर घेतला आणि देवाच्या डोक्यात मारला. तो तिच्या डोक्यात इतके वार करायला लागला जोवर तिचा मृत्यू होत नाही. इतक्या वर्षांची मैत्री, प्रेम आणि नाते विसरून देवाला कायमचं संपवायचं हा विचार त्याने केला आणि घडलेही तसेच. मुलीच्या हत्येनंतर तो फरार झाला. परंतु पोलिसांनी तपासात आरोपी वैष्णवला अटक केली. गर्लफ्रेंडवर संशय असल्याने तिला संपवले अशी कबुली आरोपीने पोलिसांना दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी