शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

'बाबा, तुमचं म्हणणं बरोबर होतं', लग्नाच्या 7 महिन्यांनंतर वधूची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 9:53 AM

Kerala : सुसाईड नोटमध्ये मोफियाने तिने आपल्या मृत्यूसाठी पती मुहम्मद सुहैल (Muhammad Suhail), सासरा युसूफ  (Yusuf)आणि सासू रुखिया (Rukhiya)यांना जबाबदार धरले आहे.

कोच्ची : केरळमधील (Kerala) एडायपुरम (Edayapuram) येथील 21 वर्षीय लॉ कॉलेजची विद्यार्थिनी (Law Student) असलेल्या मोफिया परवीन दिलशाद (Mofiya Parveen Dilshad) हिने आत्महत्या केली आहे. मोफियाने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे, 'बाबा, तुमचं म्हणणं बरोबर होतं. तो चांगला माणूस नव्हता'. साईड नोटमध्ये मोफियाने तिने आपल्या मृत्यूसाठी पती मुहम्मद सुहैल (Muhammad Suhail), सासरा युसूफ (Yusuf)आणि सासू रुखिया (Rukhiya)यांना जबाबदार धरले आहे.

टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मृत मुलीच्या वडिलांनी सांगितले की, मुलीने तिच्या खोलीत लावलेल्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. मुलीचा सासरच्या घरी खूप छळ झाला. मुलीचा पती, सासरा आणि सासूकडून छळ केला जात होता. याचबरोबर, काही दिवसांपूर्वी मोफियाने अलुवाच्या एसपीकडेही तक्रार केली होती.

त्यानंतर त्यांनी अलुवा पोलीस ठाण्याला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानंतर अलुवाचे सर्कल इन्स्पेक्टर सीएल सुधीर यांनी दोन्ही बाजूच्या मंडळींना पोलीस ठाण्यात बोलावले होते. अलुवा पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर सीएल सुधीर यांनी मोफियाचा पती मुहम्मद सुहैल आणि त्याच्या कुटुंबीयांची बाजू घेतली. यामुळे मोफिया निराश झाली आणि नंतर तिने गळफास लावून घेतला, असेही मोफियाच्या वडिलांनी सांगितले.

फेसबुकद्वारे दोघांची भेटमोफिया आणि मुहम्मद सुहेल यांची भेट फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. ते काही दिवस सतत बोलत होते आणि नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर याच वर्षी एप्रिलमध्ये दोघांनी लग्न केले. मोफियाच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या वेळी मुहम्मद सुहैलने सांगितले होते की तो संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये काम करतो. ती एक ब्लॉगर देखील आहे. पण लग्नानंतर सुहैलने सांगितले की, त्याला चित्रपट निर्माता बनायचे आहे. यासाठी त्याने मोफियाकडे हुंडा म्हणून 40 लाख रुपये मागितले. हुंडा देण्यावर मोफियाचा विश्वास नव्हता, म्हणून तिने नकार दिला. त्यानंतर सासरच्या घरात मोफियाचा छळ होत होता.

मुहम्मद सुहैल पोलिसांच्या ताब्यातमुहम्मद सुहैल आणि त्याच्या पालकांना कोठमंगलम पोलिसांनी बुधवारी, 24 नोव्हेंबरला ताब्यात घेतले आहे. कारण मोफियाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात त्याचे नाव होते. त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान, इन्स्पेक्टर सीएल सुधीर यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सर्कल इन्स्पेक्टरवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अलुवाचे आमदार अन्वर सदाथ पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKeralaकेरळ