शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

Kerala Elephant Death : आरोपींची धरपकड सुरु, एका संशयित व्यक्तीची केली चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 16:54 IST

गुरुवारी मनार्कड वन पथकाने एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीची चौकशी केली जात आहे. तथापि, ही व्यक्ती कोण आहे याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

ठळक मुद्देहत्तीणीच्या मृत्यूचे मुख्य कारण अननसात फटाके खायला दिले हे असू शकते. तथापि, अद्याप आमच्याकडे कोणताही पुरावा नाही. आता हे कसले स्फोटक आहे, ते अननस, फळांनी किंवा इतर कोणत्याही प्रकारे लपेटले गेले होते, ही संपूर्ण माहिती पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच आपल्याकडे येईल.

गर्भवती हत्तीणीच्या निर्घृण हत्येचा देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. भुकेनं व्याकूळ असलेल्या हत्तीणीला अननसाच्या आवरणातून फटाके खायला दिली आणि त्यामुळे तिचं तोंड भाजलं... त्यानंतर ती काहीच खाऊ न शकल्यानं तिचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. केरळमधील मल्लापूरम भागातील रहिवाशांनी या हत्तीणीची हत्या केल्याचा संशय आहे. या घटनेचा तीव्र निषेध होत असताना अशाच प्रकारे एका हत्तीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. हत्तीणीच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक करून त्यांना शिक्षा करण्याची मागणी लोक करत आहेत. दरम्यान, गुरुवारी मनार्कड वन पथकाने एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीची चौकशी केली जात आहे. तथापि, ही व्यक्ती कोण आहे याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.वनविभागाचे प्रधान मुख्य संरक्षक आणि मुख्य वन्यजीव वॉर्डन सुरेंद्र कुमार यांनी न्यूज 18 शी बोलताना सांगितले की, "हत्तीणीच्या मृत्यूचे मुख्य कारण अननसात फटाके खायला दिले हे असू शकते. तथापि, अद्याप आमच्याकडे कोणताही पुरावा नाही. मुख्य वन्यजीव वॉर्डन म्हणाले की, प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवालात स्फोटात हत्तीणीच्या तोंडाला जखम झाल्याचे दिसून आले. “आता हे कसले स्फोटक आहे, ते अननस, फळांनी किंवा इतर कोणत्याही प्रकारे लपेटले गेले होते, ही संपूर्ण माहिती पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच आपल्याकडे येईल.केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी सांगितले की केरळमधील मल्लापुरममध्ये हत्तीणीच्या हत्येबद्दल केंद्र सरकारने गांभीर्य दाखवले आहे. आम्ही योग्य चौकशी करुन दोषींना पकडण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. हत्तींना फटाके खाऊन मारणे ही भारतीय संस्कृती नाही. ज्यांनी अननसात स्फोटके ठेवून हत्तीला खाद्य दिले होते, त्यांना पकडण्याचा प्रयत्न तीव्र करण्यात आला आहे.काय आहे संपूर्ण प्रकरणकेरळमधील मल्लपुरममधून मानवतेला हादरवून टाकणारी एक घटना समोर आली आहे. येथे, एक गर्भवती महिला अन्नाच्या शोधात जंगलाजवळील गावात आली, पण तेथे नराधमांनी अननसात फटाके भरले आणि हत्तीणीला खायला घातले, ज्याने तिच्या तोंडाला आणि जबड्यांना जबर जखमी केले.वनविभागाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, स्फोटकामुळे त्याचे दातही तुटले होते. यानंतरही मादी हत्तीणीने गावातील कोणाचेही नुकसान केले नाही आणि तिने वेलीयार नदी गाठली, जिथे ती तीन दिवस पाण्यात उभी राहिली. नंतर तिचा आणि तिच्या पोटातील पिल्लाचा मृत्यू झाला.

 

विजय मल्ल्या प्रत्यार्पणाची निव्वळ अफवा? लवकरच भारतात आणण्याचे वृत्त ईडीने फेटाळली

 

Coronavirus: कोरोनाग्रस्ताला घरी पाहून कुटुंबाला आनंद; पण मध्यरात्री पोलीस आले अन् रुग्णाला घेऊन गेले, कारण...

 

वडिलांनी मुलीची हत्या करून कब्रस्तानमध्ये मृतदेह पुरला, नंतर बेपत्ता झाल्याची अफवा पसरवली 

टॅग्स :Keralaकेरळforest departmentवनविभागDeathमृत्यू