मेरठच्या सौरभ हत्याकांडात आता नवीन खुलासे होत आहेत. सौरभ हत्याकांडातील मुख्य आरोपी मुस्कानच्या आईबद्दलही पोलिसांना तपासात नवीन माहिती मिळाली आहे. आपल्या खुनी मुलीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणारी आणि रडत माध्यमांसमोर आलेली कविता रस्तोगी ही मुस्कानची सावत्र आई आहे. सौरभच्या कुटुंबाने मुस्कानच्या कुटुंबावर पैशांबाबत केलेल्या सर्व आरोपांची चौकशी सुरू झाली आहे.
मेरठचे एसपी सिटी आयुष विक्रम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस तपासात सौरभकडे सुमारे ६ लाख रुपये असल्याचं समोर आलं, त्यापैकी १ लाख रुपये मुस्कानच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धक्कादायक बाब म्हणजे मुस्कानच्या आईच्या खात्यातही पैसे पाठवण्यात आले. यापूर्वी कधी आणि किती पैसे पाठवले गेले आणि हे पैसे कुठे वापरले गेले यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.
एसपी सिटी आयुष विक्रम म्हणाले की, मुस्कान आणि सौरभला रिमांडवर घेतलं जाईल. आरोपपत्र दाखल करण्यासाठी दोन पथकं तयार करण्यात आली आहेत. पुरावे गोळा केले जात आहेत. चौकशी सुरू आहे. सर्व काही चिन्हांकित केलं आहे. हे दोघेही मेरठच्या बाहेर कधी आणि कुठे गेले आणि शिमलामध्ये कुठे गेले याची माहितीही गोळा केली जात आहे. त्याच्या फोनची चौकशी सुरू आहे. ही हत्या पूर्ण नियोजनाने करण्यात आली होती. मुस्कान आणि साहिल यांनीही दिशाभूल करण्याचा खूप प्रयत्न केला.
सौरभच्या भावाने केले गंभीर आरोप
सौरभचा भाऊ बबलू म्हणाला की, सौरभ लंडनहून लाखो पाऊंड घेऊन आला होता. सौरभने मुस्कानच्या कुटुंबाच्या खात्यात पैसे जमा केले होते, ज्याची सखोल चौकशी झाली पाहिजे.मुस्कानच्या कुटुंबाने सौरभच्या पैशांनी घर खरेदी केलं आहे. सौरभच्या पैशांनी आयफोनही खरेदी केला होता. आम्ही साहिलला ओळखत नाही. मी पहिल्यांदाच त्याचा चेहरा पाहिला.
मुस्कान हिरोईन बनण्यासाठी पळून गेली
सौरभ लंडनला जाण्यापूर्वी मुस्कान कोणासोबत तरी पळून गेली होती. मुस्कान हिरोईन बनण्यासाठी पळून गेली होती. यानंतर आम्ही सौरभकडून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. पण घटस्फोट होऊ शकला नाही. बबलूचा दावा आहे की, मुस्कानचे पालकही या संपूर्ण हत्येत सहभागी असू शकतात. मुस्कानच्या घरी खाण्यापिण्याचे वांदे आहेत. मुस्कानचे वडील पूर्वी एका ज्वेलर्सकडे काम करायचे.