शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

करणी सेना आक्रमक; सलमानच्या घराबाहेर वाढवली सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 18:57 IST

सुरक्षेच्या कारणास्तव करणी सेनेच्या धमकीनंतर पोलिसांनी सलमानच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशो बंद करण्याबाबत करणी सेनेने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. गुरूवारी रात्रीपासून सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांनी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवली आहे. 

मुंबई - बिग बॉस - १३ शो बंद करण्यावरून करणी सेना आक्रमक झाली असून त्यांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर आज आंदोलन केले आहे. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव करणी सेनेच्या धमकीनंतर पोलिसांनी सलमानच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.यंदा बिग बॉसमध्ये बेस्ट फ्रेंड्स फॉरेव्हर (BFF) ही नवी संकल्पना मांडण्यात आली. यात सर्व स्पर्धकांना त्यांच्या जोड्या निवडण्यास सांगण्यात आले. या जोड्या एकाच बेडवर झोपणार असून यात काही महिला स्पर्धकांनी पुरुष स्पर्धकाला जोडीदार म्हणून निवडले आहे. त्यानुसार काश्मिरी मुलाबरोबर हिंदू मुलगी बेड शेअर करीत आहे. त्यामुळेच हिंदू मुलींना आधुनिक बनवण्याच्या नावाखाली चुकीची मानसिकता पसरविली जात असल्याने करणी सेना आक्रमक झाली असून या सेनेने आक्षेप घेत हा शो बंद करण्याची मागणी केली आहे.बिग बॉस - १३ शो सुरू होऊन आता अवघे २ आठवडे झाले आहेत. हा शो बंद करण्याबाबत करणी सेनेने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. पत्रात हा शो बंद करण्याची मागणी केली आहे. या शो च्या माध्यमातून लव्ह जिहाद पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच हिंदू संस्कृतीची प्रतिमा मलिन करण्यात प्रयत्न सलमान करत असून शो बंद न केल्यास शोचे सूत्रसंचालन करणाऱ्या अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर आंदोलन छेडण्याचा इशारा करणी सेनेने दिला होता. त्यामुळे गुरूवारी रात्रीपासून सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांनी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवली आहे. 

टॅग्स :Salman Khanसलमान खानPoliceपोलिसBigg Boss 13बिग बॉसMumbaiमुंबई