Karnataka Crime: देशभरात हुंडा आणि मानसिक छळाच्या घटना गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या असतानाच कर्नाटकच्या बीदर जिल्ह्यातील बसवकल्याण परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या तीन वर्षांतच अंजनाबाई पाटील (२२) या विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. मात्र, हे प्रकरण केवळ आत्महत्येपुरते मर्यादित नसून, सासरच्या मंडळींनी तिला चुकीच्या मार्गाला जाण्यासाठी प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
अंजनाबाई यांचा विवाह २०२२ मध्ये शेखर पाटील याच्याशी झाला होता. त्यांना ११ महिन्यांची एक लहान मुलगी आहे. पती शेखर हा पाणीपुरीचा व्यवसाय करतो. व्यवसायानिमित्त तो दररोज रात्री उशिरा घरी परतत असे. यावरून पती-पत्नीत वारंवार खटके उडत होते. अंजनाबाईने याबद्दल सासू-साऱ्यांकडे तक्रार केली असता, त्यांनी मुलाची बाजू घेत धंदा उशिरापर्यंत चालतो, तुला जुळवून घ्यावेच लागेल, असे म्हणत तिलाच सुनावले.
छळाची सीमा ओलांडली; वडिलांचे गंभीर आरोप
अंजनाबाईच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. सासरच्या मंडळींनी अंजनाबाईला केवळ स्वयंपाक येत नाही म्हणून टोमणे मारले नाहीत, तर तिचे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खच्चीकरण केले. तक्रारीनुसार, सासू अरुणाबाई हिचे काही अनैतिक संबंध होते आणि ती अंजनाबाईवरही वेश्या व्यवसायात उतरण्यासाठी सातत्याने दबाव टाकत होती. या छळाबाबत अंजनाबाईने आपल्या माहेरी फोनवरून माहिती दिली होती.
६ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड ते सव्वा दोनच्या सुमारास अंजनाबाईने हॉलमधील छताला पांढऱ्या दोरीने गळफास घेतल्याची माहिती माहेरच्यांना मिळाली. नातेवाईक जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा अंजनाबाईचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता. मात्र, ही आत्महत्या नसून हत्या असावी, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. घटनेच्या वेळी वापरण्यात आलेली पांढरी दोरी अगदी नवीन असल्याने संशय बळावला आहे. या प्रकरणी बसवकल्याण शहर पोलिसांनी पती शेखर पाटील, सासू अरुणाबाई आणि सासरा चंद्रकांत यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Web Summary : In Bidar, a 22-year-old woman died allegedly due to harassment from her in-laws. Her father accused the mother-in-law of pressuring her into prostitution. Police have registered a case against the husband and in-laws, suspecting foul play in the death.
Web Summary : बीदर में, एक 22 वर्षीय महिला की कथित तौर पर ससुराल वालों द्वारा उत्पीड़न के कारण मौत हो गई। उसके पिता ने सास पर उसे वेश्यावृत्ति के लिए मजबूर करने का आरोप लगाया। पुलिस ने पति और ससुराल वालों के खिलाफ मामला दर्ज कर मौत में गड़बड़ी की आशंका जताई है।