कर्नाटकच्या बेळगावमध्ये एका इंजिनिअरच्या घरात अफाट संपत्ती असल्याचं उघडकीस आलं आहे. 'सिटी डेव्हलपमेंट सेल'मधील असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर अजय सिंह राजपूत याच्याकडे १४ कोटी रुपयांहून अधिक बेहिशोबी मालमत्ता असल्याचं लोकायुक्त अधिकाऱ्यांनी उघड केलं आहे. या अफाट संपत्तीची तपासणी करण्यासाठी पथकाला तब्बल दोन दिवस लागले.
दोन दिवस चाललेल्या या कारवाईत अंजनैया नगर येथील त्याचं निवासस्थान, कार्यालय परिसर आणि बँक लॉकरसह एकूण सात ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. तपासादरम्यान अधिकाऱ्यांना बेळगावीमध्ये तीन घरं आणि सवदत्ती, हुबळी व हुक्केरी येथे १८ प्लॉट्स आढळले आहेत.
महागड्या लक्झरी कार आणि बाईक्स जप्त
छापेमारीत ६ किलो सोनं, ५ किलो चांदी, ३.१२ कोटी रुपये, तसेच महागड्या लक्झरी कार आणि बाईक्स जप्त करण्यात आल्या आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक कमावलेल्या मालमत्तेवर अधिकाऱ्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं आहे.
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
दिल्लीमध्ये ईडीने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत रिअल इस्टेट क्षेत्रातील एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. 'अर्थ इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड' (EIL) आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांशी हे प्रकरण निगडित आहे. ईडीच्या दिल्ली विभागीय कार्यालयाच्या पथकाने १० एप्रिल २०२६ रोजी या प्रकरणी दिल्ली आणि गुरुग्राममधील १० ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, दागिने, सोन्याच्या विटा आणि महागडी घड्याळं जप्त करण्यात आली आहेत.
Web Summary : A Belgaum engineer, Ajay Singh Rajput, faces scrutiny after authorities discovered disproportionate assets worth over ₹14 crore. Raids revealed houses, plots, gold, silver, cash, luxury cars, and bikes. Investigation focuses on income sources.
Web Summary : बेलागावी में इंजीनियर अजय सिंह राजपूत की ₹14 करोड़ से अधिक की अनुपातहीन संपत्ति उजागर हुई। छापे में घर, प्लॉट, सोना, चांदी, नकदी, लग्जरी कारें और बाइकें मिलीं। जांच आय के स्रोतों पर केंद्रित है।